शेती व्यवसाया पुढील उभे असलेले नैसर्गिक आपत्तीचे संकट आणि हवामान बदल या दोन कारणांनी शेती व्यवसायाला गेल्या काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर फटका बसलेला दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्टिकोनातून कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे. तसेच दुसरे म्हणजे बऱ्याचदा घसरलेले शेतीमालाचे बाजार भाव यामुळे देखील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. या सगळ्या परिस्थितीतून शेतकरी अनेक पर्यायांचा अवलंब करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतात.
त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून वेगवेगळ्या पिकांच्या लागवडीतून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा शेतकरी प्रयत्न करतात. भाजीपाला तसेच फुलपिके आणि फळपिके लागवडीच्या माध्यमातून आता शेतकरी चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण बघितले तर या सगळ्या परिस्थितीवर मात करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या शिरोडी या गावचे ज्ञानेश्वर डगळे यांची यशोगाथा बघितली तर त्यांनी शेतीमध्ये बदल केला व स्वतः घरी तयार केलेल्या सेंद्रिय निविष्ठांचा वापर शेतीत करून लाल कांद्याचे उत्पादन घेण्यामध्ये मास्टरी मिळवलेली आहे.
हा शेतकरी एकरी घेतो दीडशे क्विंटल लाल कांद्याचे उत्पादन
याबाबत सविस्तर वृत्त असे की, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या शिरोडी या गावचे शेतकरी ज्ञानेश्वर डगळे यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती असून शेतीमध्ये ते पारंपारिक अशी कपाशी तसेच मका,तूर व लाल कांद्याचे उत्पादन घेत होते. परंतु या सगळ्या उत्पादनातून त्यांचा उत्पादन खर्च आणि मिळणारा पैसा यांचा ताळमेळ कुठेच बसत नव्हता.
म्हणून त्यांनी शेतीमध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालवले व या प्रयत्नांचाच भाग म्हणून त्यांची ओळख कृषी विज्ञान केंद्राशी झाली. यामुळे त्यांना सेंद्रिय शेती बद्दलचे तसेच मातीचे आरोग्य यांचे महत्त्व कळले व त्यांनी स्वतःच्या शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करण्याचे ठरवले. ज्ञानेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर त्यांच्यामध्ये लाल कांदा पिकामध्ये जर सेंद्रिय निविष्ठांचा वापर केला तर आपल्याला उत्पादनात मोठा बदल दिसून येतो.
लाल कांद्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की परिसरातील शेतकरी एकरी 70 ते 80 क्विंटल एकरी उतारा मिळवतात. परंतु मी मात्र 150 क्विंटल पर्यंत कांदा उत्पादन घेतो असे देखील त्यांनी म्हटले. सध्या त्यांच्या दहा गुंठे क्षेत्रामध्ये लाल कांद्याची रोपवाटिका तयार केली असून या हंगामामध्ये दीड एकरमध्ये लाल कांद्याची लागवड करणार आहेत.
स्वतः कशी तयार करतात सेंद्रिय निविष्ठा?
ज्ञानेश्वर डगळे हे शेतासाठी लागणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा घरीच तयार करतात. याकरिता ते प्रामुख्याने गुळ, बेसन पीठ तसेच वेस्ट डी कंपोजर यांचा वापर करतात व हे दोनशे लिटर पाणी टाकून त्या पाण्याद्वारे गांडूळ खत प्रक्रियेच्या माध्यमातून मिळणाऱ्या वर्मी वाशला साठवतात व यामध्ये विविध फळे टाकले जातात. त्यानंतर प्रत्येक तीन दिवसांनी हे मिश्रण ढवळत सलग 20 ते 22 पर्यंत सलग प्रक्रिया केली जाते. अशाप्रकारे अधिक फायदा देणारे सेंद्रिय निविष्ठा तयार होते.