कृषी

Okra Crop Variety: भेंडीच्या ‘या’ पाच जाती लावा व कमी वेळेत चांगले उत्पादन आणि भरघोस नफा मिळवा! वाचा ए टू झेड माहिती

Okra Crop Variety:- सध्या भाजीपाला पिकांची लागवड महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर करतात. अनेक महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला शेतीत कमीत कमी खर्च व कमीत कमी कालावधीत लाखात नफा मिळवण्याची किमया देखील शेतकऱ्यांनी साध्य केलेली आहे.

जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर प्रामुख्याने टोमॅटो, मिरची तसेच वांगे, वेलवर्गीय भाजीपाला मध्ये गिलके तसेच कारले आणि इतर मध्ये भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्रमध्ये खानदेश पट्ट्यात भेंडी या भाजीपाला पिकाची लागवड खूप मोठ्या प्रमाणावर होत असते.

या अनुषंगाने जर आपल्याला भाजीपाला पिकापासून  भरघोस उत्पादन हवे असेल तर व्यवस्थापन महत्त्वाचे आहेच परंतु त्यासोबतच भाजीपाला पिकांच्या दर्जेदार व सुधारित जातींची लागवड ही खूप महत्त्वपूर्ण ठरते.

अगदी हीच बाब भेंडी या भाजीपाला पिकाला देखील लागू होते. म्हणूनच आपण या लेखांमध्ये भेंडी या पिकाच्या महत्त्वाच्या अशा काही जाती बघणार आहोत ज्या कमीत कमी वेळेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन शेतकऱ्यांना देऊ शकतात.

 भेंडीच्या या सुधारित जाती कमी वेळात देतील भरघोस उत्पादन

1- पुसा सावनी भेंडीची ही जात उन्हाळी तसेच हिवाळा आणि पावसाळी हंगामामध्ये सहजपणे पिकवता येते. साधारणपणे लागवडीनंतर पावसाळ्यात ही जात 60 ते 65 दिवसात उत्पादन द्यायला सुरुवात करते. या जातीपासून भेंडीचे भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होते.

2- परभणी क्रांती भेंडीची ही जात पिटा या रोगाला प्रतिरोधक अशी मानली जाते तसेच लागवडीनंतर 50 दिवसात काढणीस तयार होते. परभणी क्रांती जातीच्या भेंडीचा रंग हा गडद हिरवा असतो व 15 ते 18 सेंटीमीटर लांबीची भेंडी या वाणापासून आपल्याला मिळते व उत्पादन देखील भरघोस मिळते.

3- अर्का अनामिका भेंडीची ही जात येलो मोझेक विषाणू रोगाशी प्रतिकारक असून या जातीची भेंडी ही अतिशय मऊ असते व प्रामुख्याने केसाळ नसते. अर्का अनामिका ही जात उन्हाळा आणि पावसाळी हंगामामध्ये चांगले उत्पादन देण्यास सक्षम आहे.

4- पंजाब पद्मिनी भेंडीची ही जात पंजाब विद्यापीठाने विकसित केली असून या जातीची भेंडी सरळ आणि लांबीने देखील चांगली असते. पंजाब पद्मिनी जातीची भेंडी ही गडद रंगाची येते व तिला मार्केटमध्ये बाजार भाव देखील चांगला मिळतो.

5- अर्का अभय भेंडीची ही जात पिवळ्या मोझेक विषाणू रोगाशी लढण्यासाठी सक्षम असून लागवडीनंतर अगदी कमीत कमी दिवसांमध्ये चांगले उत्पादन द्यायला सुरुवात करते. या जातीची भेंडीची झाडे ही 120 ते दीडशे सेंटीमीटर उंच आणि सरळ वाढतात.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts