कृषी

सरकारच्या ‘या’ योजनेत भाग घ्या आणि फळबागांचे लाखो रुपयांचे नुकसान टाळा! शेतकऱ्यांना मिळेल लाखोचा फायदा

कृषी क्षेत्र म्हटले म्हणजे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे विविध प्रकारच्या नैसर्गिक परिस्थितीचा विपरीत किंवा चांगला परिणाम हा शेती क्षेत्रावर होत असतो. बऱ्याचदा आपल्याला माहित आहे की अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे फळ पिकांचे व इतर पिकांचे देखील खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसतो.

या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती पासून शेती पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे याकरिता शासनाने पिक विमा योजना व फळबागांसाठी हवामान आधारित फळ पिक विमा योजना लागू केली आहे. फळबागांच्या दृष्टिकोनातून जर आपण हवामानावर आधारित असलेली फळ पिक विमा योजनेचा विचार केला तर यामध्ये कमी तापमान किंवा जास्त तापमान,

गारपीट किंवा अवकाळी पाऊस, सापेक्ष आद्रता व वेगाचा वारा इत्यादी हवामान धोक्यांमुळे जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई मिळते. त्यामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांना टाळता येते. या दृष्टिकोनातून आपण या लेखात ही योजना नेमकी काय आहे व त्यासाठी कुठल्या पात्रता लागतात? काय आहे ते या योजनेचे फायदे? इत्यादी बद्दल महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत.

 काय आहे हवामान आधारित फळपिक विमा योजना?

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, अवकाळी पाऊस तसेच कमी व जास्त तापमान, गारपीट तसेच जास्तीचा पाऊस, सापेक्ष आद्रता, वेगाने वाहणारे वारे इत्यादी हवामान धोक्यामुळे जर फळपिकांचे मोठे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना या माध्यमातून भरपाई मिळणे शक्य आहे. त्याकरता शेतकऱ्यांना खालील पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

1- शेतकऱ्याच्या ज्या ठिकाणी राहत आहे त्या ठिकाणी अधीसुचित क्षेत्रामध्ये ज्या फळ पिकाचा समावेश केलेला आहे त्या फळ पिकाचे उत्पादन शेतकरी घेत असावा.

2- शेतकरी हा कुळाने किंवा भाडेपट्टीने किंवा स्वतःच्या जमिनीवर फळबाग घेत असावा.

3- शेतकरी पीक कर्ज घेत असला किंवा बिगर कर्जदार असला तरी या योजनेत तो सहभागी होऊ शकतो.

4- यामध्ये महत्वाची पात्रता म्हणजे शेतकऱ्याची जी काही फळबाग आहे ती सध्या उत्पादनक्षम अवस्थेमध्ये किंवा वयामध्ये असणे गरजेचे आहे.

5- यामध्ये शेतकऱ्यांना विहित मुदतीत विमा हप्ता भरावा लागतो व विमा हप्ता शेतकऱ्यांसाठी पाच टक्के आहे. परंतु यामध्ये वास्तववादी विमा हप्ता जर 35 टक्यांपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांना नियमित पाच टक्क्यांपेक्षा अधिक चा विमा हप्ता भरावा लागतो व हा विमा हप्ता ऑनलाइन किंवा बँकेमध्ये शेतकऱ्यांना भरता येतो. शेतकरी बंधूंनी ऑनलाईन हप्ता भरण्याकरिता फळ पिक विमा पोर्टल  www.pmfby.gov.in

या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

 ही बाब लक्षात ठेवावी

वर उल्लेख केलेल्या हवामान धोक्याचा ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील ज्या पिकासाठी शेतकऱ्यांनी भाग घेतलेला आहे त्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येते. त्याच गारपीट किंवा वेगाने वाहणारे वारे यामुळे जर नुकसान झाले तर 72 तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला यासंबंधीची सूचना देणे गरजेचे आहे.

त्यानंतर वैयक्तिक पंचनामा करून नुकसान भरपाई निश्चित किंवा अंतिम केली जाते. याकरता शेतकऱ्यांनी या योजनेची पूर्ण माहिती घ्यावी व पात्रता पूर्ण करून योजनेमध्ये सहभागी व्हावे. महत्त्वाचे म्हणजे विहित मुदतीमध्ये विम्याचा हप्ता भरावा व हवामान धोक्यापासून फळबागांचे संरक्षण करावे. तुम्ही योजनेत सहभाग घेण्यापूर्वी संबंधित विमा कंपनीची पूर्ण माहिती घ्यावी व विमा भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करावे.

 काय आहेत या योजनेचे फायदे?

शेतकऱ्यांचे हवामान धोक्यांपासून संरक्षण होते तसेच आर्थिक नुकसान होण्याची जी काही शक्यता असते व शेतकऱ्यांना जो काही मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसू शकतो त्यापासून सुरक्षा मिळते. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील कमी करता येतो व शेती व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना फायदा होतो व स्थिरता देखील मिळते.

हवामान आधारित फळ पिक विमा योजनेच्या सहाय्याने होणारे आर्थिक नुकसान टाळावे व अधिकची माहिती घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts