Tomato Market Price:- टोमॅटो आणि कांदा या दोन्ही पिकांचा विचार केला तर बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचेच काम ही पिके करतात. बऱ्याचदा आपण पाहतो की टोमॅटोला बाजार भाव नसल्यामुळे रस्त्यावर फेकून द्यायची वेळ येते.
तीच गत कांद्याची देखील होताना दिसून येते. या दोन्ही पिकांना लागणारा उत्पादन खर्च पाहिला तर तो इतर पिकांच्या तुलनेत जास्तच येतो परंतु बाजार भाव हा कायमच शेतकऱ्यांची निराशा करणाराच असतो.
गेल्या कित्येक वर्षापासून या वर्षीचा हंगाम वगळता टोमॅटोला इतके उच्चांकी दर कधी मिळाले नव्हते. परंतु साधारणपणे दोन ते अडीच महिन्यापर्यंत टोमॅटोचे दर टिकून राहिले व आता परत मातीमोल दराने टोमॅटो विकावा लागत आहे.दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे
टोमॅटो हे नाशिवंत असल्यामुळे त्याची साठवणूक देखील करता येत नाही. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे लवकर खराब होण्याचे प्रमाणजास्त असते.
त्यामुळे आहे त्या भावामध्ये शेतकऱ्यांना टोमॅटो विकण्याशिवाय कुठलाही पर्याय नसतो. शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो. या सगळ्या समस्येवर मात करण्यासाठी जर शेतीमालावर प्रक्रिया उद्योगाची कास धरली तर नक्कीच या समस्या पासून शेतकरी स्वतःचे मुक्तता करू शकतात.
या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी टोमॅटो प्रक्रिया साठी एक छोटासा प्लांट उभा केला तरी कमी खर्चामध्ये निश्चित नफा मिळू शकतो. त्यामुळे कवडीमोल दरात टोमॅटो विकण्यापेक्षा किंवा गुराढोरांपुढे टाकण्यापेक्षा जर त्यावर प्रक्रिया करून त्याची विक्री केली तर नक्कीच शेतकरी लाखोत नफा मिळवू शकतात.
टोमॅटो वर प्रक्रिया करून आपण टोमॅटो ज्यूस तसेच सॉस, टोमॅटो केचप, टोमॅटो चटणी तसेच कॉकटेल व टोमॅटो पिकल यासारखे बरेच प्रक्रियायुक्त पदार्थ बनवू शकता. याच अनुषंगाने आपण टोमॅटो पासून साध्या पद्धतीने प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवावे त्याबद्दलची माहिती घेऊ.
टोमॅटो प्रक्रिया युक्त पदार्थ
1- टोमॅटो ज्यूस- टोमॅटो पासून 100 लिटर ज्यूस बनवण्याकरिता तुम्हाला साखर एक हजार ग्रॅम, पाचशे ग्रॅम मीठ तसेच शंभर ग्रॅम सायट्रिक ऍसिड आणि सोडियम बेंजोएट 100 ग्रॅम इतके साहित्य लागते. टोमॅटो ज्यूस बनवण्याकरिता तुम्ही पूर्ण पिकलेले आणि लाल रंगांच्या टोमॅटोची निवड करावी. त्यानंतर त्यांना तुकड्यांमध्ये काढून घ्यावे व 70 ते 90 अंश सेल्सिअस मध्ये तीन ते पाच मिनिटांसाठी गरम करावे. त्यानंतर त्यामधून ज्यूस काढा व त्यामध्ये मीठ, साखर आणि सायट्रिक ऍसिड मिसळून घ्यावे. त्या मिश्रणाला व्यवस्थित हलवून घ्या व जेणेकरून ते एकजीव होईल अशा पद्धतीने त्याला हलवावे. हे केल्यानंतर 82 ते 88 अंश सेल्सिअसला परत एक मिनिटांसाठी गरम करावे व त्यानंतर त्याला बॉटलमध्ये भरून घ्यावे. बॉटलला निर्जंतुक करून घ्या व नंतर थंड करावे.
2- टोमॅटो केचप- याकरिता फळातील गर 100 किलो, 7500 ग्रॅम साखर, 1000 ग्रॅम मीठ, पाच किलो कांदे तसेच एक किलो आले, पाचशे ग्रॅम लसूण, लाल मिरची पावडर पाचशे ग्रॅम, मसाल्यामध्ये जिरे, दालचिनी आणि इलायची, विनेगर 2500 मिली आणि सोडियम बेंजोएट 25 ग्रॅम. टोमॅटो केचप तयार करण्यासाठी टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे व त्यानंतर त्याला कापून घ्यावे. त्यानंतर 70 ते 90 अंश सेल्सिअस तापमानाला तीन ते पाच मिनिटांसाठी गरम करावे. त्यानंतर त्याचा ज्यूस काढावा व त्याला चांगला चाळून घ्यावा. त्यानंतर त्या ज्यूसला साखर सोबत व्यवस्थित शिजवावे व त्यानंतर मसाल्यांची पिशवी आत सोडावी. तिला बाहेरून दाबावे आणि मसाले बाहेर काढावे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ टाकून परत शिजवावे. ब्रिक्स 28 येईल तोपर्यंत तपासावे व त्यानंतर व्हिनेगार टाकावा आणि 88 अंश सेल्सिअसला बॉटलमध्ये भरावा.
3- टोमॅटो चटणी- टोमॅटो चटणी तयार करण्याकरता 100 किलो टोमॅटो, 50 किलो साखर तसेच 2500 ग्राम मीठ, कांदा दहा हजार ग्रॅम, आले एक किलो लसूण अर्धा किलो, एक किलो मिरची पावडर आणि इतर मसाले म्हणजेच इलायची, जिरे, दालचिनी आणि विनेगार दहा हजार मिली व सोडियम बेंजोएट 50 ग्रॅम टोमॅटो चटणी तयार करण्याकरता अगोदर टोमॅटोला स्वच्छ पाण्याने धुवून त्याला दोन मिनिट शिजवून घ्यावे. त्यासाठी 92 अंश सेल्सिअस तापमान ठेवावे. लगेच त्याला काढून थंड पाण्यामध्ये टाकावे जेणेकरून वरची साल काढणे सोपे होईल. वरची टोमॅटोची साल काढून त्याला व्यवस्थित ठेचून घ्यावे व नंतर इतर साहित्य व विनेगार टाकावे. त्यानंतर त्याला शिजवून त्यामध्ये मीठ टाकून ते पाच मिनिटापर्यंत परत शिजवावे व त्यानंतर स…