पशुपालन व्यवसायामध्ये आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत हे प्रामुख्याने दुधाचे उत्पादन हेच असते. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जनावरांचे आरोग्य आणि आहार व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते. कारण या दोन्ही व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये जर चूक झाल्या तर त्याचा विपरीत परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आहार व्यवस्थापनावर आणि आरोग्य व्यवस्थापनावर खूप लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते.
यामध्ये आहाराचा सरळ सरळ परिणाम हा दुधाच्या उत्पादनावर होत असतो त्यामुळे जनावरांना संतुलित आहार दिला तर आरोग्य ही चांगले राहते व पर्यायाने दुधाचे उत्पादन देखील वाढते. परंतु बऱ्याचदा सर्व काही ठीकठाक असताना देखील अचानक गाय किंवा म्हैस कमी दूध द्यायला लागतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढावे याकरिता अनेक प्रकारच्या उपाययोजना केल्या जातात. याच अनुषंगाने आपण या लेखांमध्ये काही नैसर्गिक आणि घरगुती असे उपाय पाहू जेणेकरून गाय व म्हशी पासून मिळणारे दुधाचे उत्पादन वाढेल.
हे उपाय करा आणि गाय व म्हशीचे दुधाचे उत्पादन वाढवा
1- आहारात चवळीचा वापर– जर आपण चवळीचे गवत म्हणजे चवळीचे वेल जर गाय किंवा म्हशीला खाऊ घातले तर दुधाचे उत्पादन वाढते. चवळीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात व त्यामुळे दुधाच्या उत्पादनावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. गाय व म्हशीच्या आरोग्यावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम न होता दुधाच्या प्रमाणामध्ये सहजतेने वाढ करता येते.
चवळी हे इतर गवतापेक्षा अधिक पचणारे असून त्यामध्ये प्रथिने आणि फायबर मुबलक प्रमाणामध्ये असते व हे घटक दूध देणाऱ्या जनावरांसाठी खूप आवश्यक असतात. त्यामुळे पशुपालकांनी गाय आणि म्हशींना चवळीच्या गवत खायला दिले तर ते फार फायद्याचे ठरू शकते.
2- दूध वाढवण्यासाठी घरगुती औषध– गाय व म्हशीचे दुधाचे प्रमाण वाढावे याकरिता घरगुती औषध देखील फायद्याचे ठरतात. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टींची आवश्यकता भासते. जे तुम्हाला सहजपणे उपलब्ध होतात. खालील पद्धतीने औषध तयार करावे. घरगुती औषध बनवण्याकरता तुम्हाला 250 ग्रॅम गव्हाची लापशी, 100 ग्रॅम गुळाचे सरबत, एक कच्चे खोबरे, 25 ग्राम जिरे आणि 25 ग्राम कॅरम चे दाणे लागतात.
अशा पद्धतीने तयार करावे औषध
सर्वप्रथम दलिया, मेथी आणि गुळ व्यवस्थित शिजवून घ्यावा व त्यानंतर नारळ बारीक करून त्यामध्ये टाकावे. त्यानंतर हे मिश्रण थंड झाल्यावर जनावरांना खायला द्यावे. हे घटक फक्त दोन महिने सकाळी रिकामे पोटी जनावरांना खायला द्यावे. गाय व्यायल्याच्या एक महिना अगोदर हे देणे सुरू करावे आणि गाय व्यायल्यानंतर एक महिन्यापर्यंत पाजावे. गाईला 21 दिवस वासरू होईपर्यंत सामान्य आहार द्यावा व वासरू तीन महिन्याचे झाल्यावर किंवा गाईचे दूध कमी झाल्यावर तिला दररोज 30 ग्रॅम जवस औषध पाजावे. यामुळे देखील दूध कमी होणार नाही.
3- मोहरीचे तेल आणि पिठापासून दूध वाढवण्याचे औषध– मोहरीचे तेल आणि पिठापासून देखील घरगुती औषध बनवून तुम्ही गाईला ते पाजू शकता. याचा देखील सकारात्मक परिणाम गाय व म्हशीच्या दुधाच्या प्रमाणात दिसून येतो. हे औषध बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 200 ते 300 ग्रॅम मोहरीचे तेल, 250 ग्राम गव्हाचे पीठ घ्यावे व दोन्ही एकत्र करून संध्याकाळच्या वेळेस जनावरांना चारा व पाणी देऊन मग खायला द्यावे.
हे औषध दिल्यानंतर मात्र जनावरांना प्यायला पाणी देऊ नये. तसेच हे औषध पाण्यासोबत देखील देऊ नये. नाहीतर जनावरांना खोकल्याची समस्या उद्भवू शकते. हे जनावर सात ते आठ दिवस जनावरांना खायला द्यावे व त्यानंतर हे औषध बंद करावे. त्याचबरोबर जनावरांना हिरवा चारा आणि इतर पोषक आहार देत राहावा तो बंद करू नये.
याव्यतिरिक्त इतर महत्त्वाची काळजी
1- याव्यतिरिक्त दुभत्या गायी व म्हशींची योग्य काळजी व निगा ठेवावी. त्यामुळे देखील दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
2- दुभत्या गाई व म्हशी यांचा गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा व यामध्ये प्रकाश व हवेची योग्य व्यवस्था असावी.
3- पावसाळ्यामध्ये जनावरांना व्यवस्थित बसता येईल अशी गोठ्यामध्ये पक्की जागा असावी.
4- उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये जनावरांसाठी कुलरची किंवा पंख्यांची सोय करावी. जेणेकरून जनावरांची उष्णतेपासून सुटका होईल.
5- जनावरांना हिरवा चारा खायला द्यावा त्यामुळे देखील दुधाचे प्रमाण वाढते.
6- जनावरांना वेळोवेळी आवश्यक लसीकरण करून घ्यावे.
7- दूध देणाऱ्या जनावरांना कधीही बाहेर सोडू नये. त्यामुळे जनावर इकडे तिकडे फिरतात व जे सापडेल ते खायला लागतात. अशावेळी काही हानिकारक पदार्थ पोटात गेल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
हे गवताचे प्रकार देखील दूध वाढवण्यास करतील मदत
1- झिरका गवत– बरसिम गवताच्या तुलनेमध्ये जिरका गवताला कमी पाणी लागते व याची लागवड करणे देखील सोपे असते. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये या गवताची लागवड करावी. जनावरांच्या दूध उत्पादन वाढीसाठी हे गवताचे महत्त्व खूप आहे.
2- बरसिम घास– हे गवत देखील दुभत्या जनावरांसाठी पौष्टिक मानले जाते. यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळून येते. जनावरे देखील हे गवत चवीने खातात त्यामुळे जनावरांची पचनक्रिया देखील चांगली राहते व दुधाचे उत्पादन वाढते.
3- नेपियर गवत– उसासारखे दिसणारे हे गवत दुभत्या जनावरांसाठी खूप फायद्याचे आहे व ते अतिशय पौष्टिक मानले जाते. हे गवत खूप कमी कालावधीमध्ये कापणीस तयार होते. साधारणपणे पन्नास दिवसात ते कापणीस तयार होते. जनावरांच्या दूध उत्पादन वाढीसाठी देखील ते खूप महत्त्वाचे आहे.