विहिरीवरील विद्युत पंप बऱ्याचदा जेव्हा शेतामध्ये पिकांना पाणी द्यायची वेळ असते तेव्हाच नेमका जळतो. त्यामुळे पिकांना वेळेत पाणी मिळणे अशक्य होते व त्याचा फटका पिकांना बसतो व उत्पादनादेखील बसण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे विद्युत पंप म्हणजे शेतातील मोटार जळण्याची कारणे कोणती आहेत हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे असते. कारण जर आपल्याला एखादी गोष्ट घडण्यांमधील कारण माहिती पडले तर आपण ते टाळतो व होणाऱ्या नुकसानीपासून वाचतो.
याचा अनुषंगाने जर आपण विचार केला तर विहिरीवरील मोटर जळण्यामागे देखील काही कारणे असतात. ती कारणे आहेत छोटी परंतु विहिरीवरील मोटार जळण्यासाठी ती पुरेशी ठरतात. म्हणून आपण या लेखामध्ये मोटर जळण्यामागील प्रमुख कारणे व ते कसे टाळावे याबद्दल माहिती घेणार आहोत.
विहिरीवरील मोटार जळण्यामागील कारणे
1- स्टार्टर– स्टार्टर मध्ये योग्य मोटारकरीता योग्य स्टार्टर घेणे खूप गरजेचे आहे. कारण बऱ्याचदा आपण तीन एचपी ची मोटारीला पाच एचपी चा स्टाटर जर बसवला तर याचा एक फायदा असा होतो की वोल्टेज कमी जास्त झाला तरी मोटर चालू व्हायला याचा फायदा होतो परंतु जर आपण मोठ्या क्षमतेचे स्टार्टर घेतले तर त्याच्यामध्ये येणारा रिले देखील मोठाच असतो.
त्याचा होल्टेज देखील मोठा असतो. जर काही कारणामुळे जास्त होल्टेज आले तर किंवा मोटारीवर जास्त लोड आला तर मोटर बंद करण्याचे महत्त्वपूर्ण काम रिले च्या माध्यमातून होते. परंतु रिले मोठा असल्यामुळे व्होल्टेज कमी जास्त झाला तर रिले मोटर बंद करत नाही व मोटर जळते. त्यामुळे मोटारीची क्षमते इतकाच त्याला योग्य असे स्टार्टर बसवणे गरजेचे आहे. म्हणजे जेणेकरून मोटार जळणार नाही.
2- फ्युजमध्ये वापरायचा तार– फ्युजमध्ये वितळतार वापरणे गरजेचे असते. कारण काही कारणामुळे जर व्होल्टेज कमी किंवा जास्त झाला तर फ्युज मधील तार वितळतो आणि मोटर बंद पडते व होणारे नुकसान टळते. बरेच शेतकरी यामध्ये तांब्याचा मोठा तार किंवा इतर मोठ्या साईजचा तार वापरतात.
यामुळे जर एखाद्या वेळी सप्लाय वाढला किंवा जास्त क्षमतेचा आला तर हा जास्त जाडीचा तार वापरल्यामुळे तो वितळत नाही व सप्लाय खंडित न झाल्यामुळे मोटर सुरूच राहते व जास्त होल्टेज मुळे ती जळते. त्यामुळे फ्युजमध्ये तार वापरताना तो नेहमी वितळतार वापरावा.
3- स्टार्टर मधील खालचा हलणारा भाग( गट्टू )- आपल्याला माहित आहे की स्टार्टरमध्ये एक खालचा भाग असतो जो मोटर चालू केल्यानंतर स्टार्टर मधील वरच्या भागाला चिकटतो व या माध्यमातून सप्लाय योग्य रीतीने प्रवाहित होतो व मोटर चालू होते. तेव्हा आपण मोटर बंद करतो तेव्हा हा गट्टू चिकटलेल्या भागापासून खाली येतो. जस यामध्ये स्प्रिंग असतात व स्प्रिंग सारखे काम या माध्यमातून पार पडत असते.
हा गट्टू जितक्या सहजतेने खाली आणि वरती जाईल त्यावर मोटारीची चालू किंवा बंद होण्याची प्रक्रिया चांगल्या प्रकारे घडत असते. या गट्टूमध्ये स्प्रिंग असतात व काही कारणास्तव या स्प्रिंग मध्ये काही खराबी आली किंवा त्यांचे एक्सटेंशन झाले तर हा गट्टू चालू केल्यानंतर वरती जातो परंतु व्यवस्थित त्या ठिकाणी चिकटत नाही किंवा बसत नाही किंवा त्याला ज्या काही पट्ट्या असतात
त्या गंजल्यामुळे देखील अशा प्रकारची समस्या निर्माण होते. त्यामुळे या पट्ट्या व्यवस्थित न चिकटल्यामुळे सप्लाय व्यवस्थित जात नाही व एंपियर मध्ये करंट कमी जातो व मोटार जळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे एका महिन्यात स्टाटरची व्यवस्थित पाहणी करून सर्विसिंग करून घेणे गरजेचे आहे.
4- ऑटो स्विच– स्टार्टर ला ऑटो स्विच कनेक्ट करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे जर एखाद्या वेळेस सप्लाय जास्त होल्टेज मध्ये आला किंवा कमी होल्टेज मध्ये आला तर मोटर आपसूकच बंद पडते. परंतु बरेच शेतकरी स्टार्टरला ऑटो स्विच वापरत नसल्यामुळे डायरेक्ट करंट स्टार्टर ला जातो व त्यामुळे एखाद्या वेळेस जर जास्त होल्टेज मध्ये सप्लाय आला तर मोटर जळण्याचा धोका संभवतो.त्यामुळे ऑटो स्वीच बसवून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे सप्लाय कमी किंवा जास्त जरी झाला तरी मोटर जळत नाही.
5- स्टार्टरची वायरिंग व्यवस्थित करा– आपल्याला स्टार्टरमध्ये बऱ्याच पॉईंटवर वायरिंग करावी लागते. त्यामुळे वायरिंग करत असताना आपण स्क्रूचा वापर करतो व स्क्रू फिट करून त्या वायरिंग फिट बसवतो. परंतु बऱ्याचदा शेतकरी वायरिंग फिट करताना स्क्रू सैल ठेवतात. याच्यामुळे असे होते की बऱ्याचदा वायरिंग व्यवस्थित फिट न केल्यामुळे आवश्यक सप्लाय अपूर्ण जातो किंवा व्यवस्थित जात नाही व तसाच अपूर्ण सप्लाय हा एंपियर पर्यंत जातो. त्यामुळे मोटर जळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे स्टार्टरच्या वायरी जोडताना त्या स्क्रू फिट करून व्यवस्थित टाइट जोडल्या पाहिजे. यामुळे मोटर वर लोड येण्याचे प्रमाण कमी होते व मोटर व्यवस्थित चालते.