कृषी

शोभिवंत मत्स्यपालनातून हा तरुण शेतकरी दिवसाला कमवत आहे 2 ते 3 हजार रुपये! कशापद्धतीने करावे शोभिवंत मत्स्यपालन?

शेतीमध्ये आता अनेक तरुण येऊ लागले असून ते आता वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय शेतीला जोडधंदा म्हणून करतात. या जोडधंदांमध्ये प्रामुख्याने पशुपालन तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. तसेच बरेच शेतकरी आता मासे पालन म्हणजेच मत्स्य व्यवसाय देखील करू लागले असून  या माध्यमातून देखील आता मोठ्या प्रमाणावर नफा शेतकऱ्यांना मिळताना दिसून येत आहे.

यामध्ये जर आपण मत्स्यपालनाचा विचार केला तर यामध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे मासे पाळले जातात व प्रामुख्याने शेतकरी शेततळे किंवा बायोफ्लॉक तंत्रज्ञानाने मत्स्य व्यवसाय करतात. परंतु यामध्ये रंगबिरंगी माशांचे पालन देखील एक चांगला व्यवसाय असून त्याला मार्केट आता वाढताना दिसून येत आहे. याच रंगीबिरंगी मत्स्यपालनाच्या माध्यमातून बिहार राज्यातील कटिहार येथील राजेश  नावाच्या तरुणाने रंगबिरंगी माशांचे पालन व प्रजनन सुरू केले असून या माध्यमातून तो चांगल्या प्रकारे आर्थिक उत्पन्न मिळवत आहे.

 काय आहे रंगीबेरंगी मत्स्यपालन?

कटिहार येथील राजेश हे अगोदर कुक्कुटपालन व्यवसाय करत होते व काही कारणांमुळे त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. दुसरे काहीतरी करावे या उद्देशाने राजेश कोलकत्ता ला गेले व त्या ठिकाणी रंगबिरंगी मत्स्यपालनाचे प्रशिक्षण घेतले व कटिहार छेताबारी या ठिकाणी येऊन रंगीबेरंगी मासे पाळण्याचा व्यवसाय सुरू केला.

विशेष म्हणजे या व्यवसायासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार जेव्हा कटीहार मध्ये आले होते त्यांनी देखील राजेशच्या या उपक्रमाचे खूप मोठे कौतुक केले होते. राजेश या व्यवसायाच्या माध्यमातून दररोज दीड ते दोन हजार रंगबिरंगी मासे पुरवून अडीच ते तीन हजार रुपये पर्यंत कमाई करत आहे. रंगीबिरंगी मासे ठेवण्यासाठी राजेश स्वतः मत्स्यालय तयार करतो. हे मत्स्यालय 1000 रुपयापासून ते तीस हजार रुपये पर्यंत मिळते.

सध्या रंगीबिरंगी माशांच्या एक मोठे मार्केट तयार होत असून या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला आर्थिक नफा मिळणे शक्य आहे. राजेश कडे सध्या एकूण 25 प्रकारचे रंगीबेरंगी मासे उपलब्ध असून ते दोन रुपये ते 200 रुपये किमतीत पर्यंत उपलब्ध आहे. या अनोख्या व्यवसायाच्या माध्यमातून राजेश इतर तरुणांसाठी देखील एक प्रेरणादायी कहानी ठरताना दिसून येत आहे.

या तीन प्रकारे करता येते शोभिवंत मत्स्य पालन

रंगीबिरंगी अर्थात शोभिवंत मत्स्य पालन व्यवसाय जागतिक स्तरावर वेगाने वाढत असून यामध्ये विविध प्रकारच्या संवर्धन पद्धती आणि व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांना कायम स्वयंरोजगाराचे एक साधन उभे करता येणे शक्य आहे. शोभिवंत मत्स्यपालन व्यवसाय हा विकसनशील देशांमधील ग्रामीण भागातील लोकांकरिता स्वयंरोजगाराचे एक मोठी संधी आहे. या प्रकारचे मत्स्यपालन तीन प्रकारे करता येते.

1- इनडोअर युनिट या प्रकारचे पद्धतीमध्ये कमी आकाराच्या जागेत मत्स्य पालन करता येणे शक्य आहे. यामध्ये घरातील एखादी खोली किंवा पडवीमध्ये मत्स्यसंवर्धन करता येते. मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन करण्यासाठी विविध प्रकारच्या आकारांच्या काचेच्या टाक्या ठेवूनच संवर्धन केले जाते. या प्रकारामध्ये जास्त किंमत मिळवून देणाऱ्या मत्स्य प्रजातींचे बीजोत्पादन आणि संवर्धनासाठी या प्रकारचे युनिट योग्य आहे.

2- यार्ड स्केल युनिट या प्रकारचे युनिट तुम्ही घरामागील पडवी किंवा समोरील अंगणामध्ये पुरेशी जागा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी करू शकतात. या प्रकारचा युनिट सुरू करण्यासाठी एक हजार ते दोन हजार चौरस फूट जागेची गरज असते  व या जागेमध्ये प्लास्टिक पूल आणि एफआरपी टॅंक ठेवून मत्स्य संवर्धन करता येते.

यामध्ये विक्री योग्य माशांच्या आकारापर्यंत संवर्धन करण्याकरिता या प्रकारचे युनिट योग्य असते व जास्त संख्येमध्ये पिल्लांना जन्म देणाऱ्या माशांच्या प्रजातींच्या संगोपनाकरिता हा युनिट योग्य असतो. एंजल तसेच गोल्ड फिश, गुरामी यासारख्या मध्यम किमतीत मिळणाऱ्या शोभिवंत मासे पालन करिता हे युनिट उपयोगी असते.

3- सिमेंट पॉंड युनिट या प्रकारांमध्ये सिमेंटचे विविध आकाराचे पॉंड बांधले जातात व त्यामध्ये मत्स्य बीजाचे संगोपन केले जाते. यार्ड स्केल युनिट पेक्षा याला थोडी मोठी जागा लागते. साधारणपणे पाच हजार चौरस फुटापर्यंत असलेल्या जागेमध्ये एक चांगले प्रकारचे युनिट बांधता येऊ शकते. या प्रकारचा युनिट उभारण्याकरिता थोडा खर्च जास्त असतो परंतु या माध्यमातून सर्व प्रकारच्या माशांचे संवर्धन हे विक्री योग्य आकारापर्यंत आरामात करता येऊ शकते व या माध्यमातून उत्पन्न देखील चांगले मिळते.

4- प्लास्टिक अस्तरीकरण तलाव युनिट पाण्याची उपलब्धता असेल आणि पाच ते दहा गुंठे आकाराची मोकळी पडिक जमीन असेल तर कमी गुंतवणूक करून मत्स्यपालनाकरिता या प्रकारचा युनिट चांगला असतो. या प्रकारचा युनिट उभारण्याकरिता जागेचा आकार आणि क्षेत्रफळाप्रमाणे पाच ते दहा मीटर लांब व दीड ते दोन मीटर रुंद आणि 1.2 मीटर खोल असे तलाव तयार केले जातात व त्यामध्ये 250 ते 350 मायक्रोन जाडीचे प्लास्टिक अस्तरीकरण करण्यात येते.

तसेच तलावाच्या एका बाजूने पाईपलाईन द्वारे पाणी घेण्यासाठी व्यवस्था करावी लागते व त्याच्या विरुद्ध बाजूने जास्तीचे पाणी वाहून जाण्याकरिता देखील पाईपच्या साह्याने व्यवस्था करावी लागते. पिले देणारे मासे जसे की मोली, गप्पी तसेच सोर्डटेल या प्रकारच्या माशांच्या संवर्धनाकरिता हे युनिट चांगले असते.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts