Tomato Farming : भारतात गेल्या काही वर्षात भाजीपाल्याच्या शेतीत (Vegetable Farming) झपाट्याने वाढली आहे. टोमॅटो (Tomato Crop) हे देखील एक भाजीपाला पीक (Vegetable Crop) असून या पिकाची शेती देशात मोठ्याप्रमाणात केले जात आहे.
टोमॅटो सदाहरित भाजी म्हणून ओळखली जाते. टोमॅटो लागवड अलीकडे बारा महिने केली जात आहे. पॉलिहाऊस च्या मदतीने शेतकरी बांधव आता या पिकाची बारा महिने शेती करू शकतात. टोमॅटो पिकाला बाजारात कायम मागणी असते तसेच यांचा वापर वर्षभर राहतो यामुळे याला चांगला बाजार भाव (Tomato Rate) देखील मिळत आहे.
नवीन शेती तंत्राद्वारे आता टोमॅटो हे भाजीपाला पीक पिकवून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा शेतकऱ्याचा मानस असतो. जाणकार लोकांच्या मते, टोमॅटोच्या लागवडीतून चांगले उत्पन्न (Farmer Income) मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनी याच्या सुधारित जातींची (Tomato Variety) शेती करणे अतिशय आवश्यक आहे.
कृषी तज्ज्ञ शेतकरी बांधवांना टोमॅटोच्या नामधारी 4266 या टोमॅटोच्या सुधारित जातींची शेती करण्याचा सल्ला देत आहेत. टोमॅटोच्या या जातीपासून शेतकरी बांधवांना चांगले उत्पादन मिळत असल्याने याची लागवडीची शिफारस आता मोठ्या प्रमाणात केली जात आहे.
अशा परिस्थितीत आज आपण नामधारी 4266 या टोमॅटो जातीच्या विशेषता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जाणकार लोकांच्या मते, ही जात शेतकऱ्यांना कमी वेळात तिप्पट उत्पादन देते अशा परिस्थितीत या जातीच्या काही प्रमुख विशेषतः देखील शेतकऱ्यांना माहीत असणे अत्यावश्यक आहे.
नामधारी 4266 टोमॅटोची प्रगत जात
नामधारी 4266 ही शास्त्रज्ञांनी विकसित केलेली एक टोमॅटोची सुधारित जात आहे. टोमॅटोची ही प्रगत जात लावणीनंतर अवघ्या 45 दिवसांत परिपक्व होत असल्याचा दावा जाणकार लोकांकडून केला जात आहे. म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात या जातीच्या टोमॅटोपासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळणार आहे. या जातीच्या टोमॅटोपासून शेतकऱ्यांना तीन पट अधिक उत्पादन मिळू शकते. यामुळे निश्चितच या जातीच्या टोमॅटोची शेती शेतकऱ्यांना धनवान बनवणार आहे.
या जातीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या जातीच्या टोमॅटो पिकाला कीटक आणि रोग होण्याचा धोका नसतो, ज्यामुळे कीटकनाशकांच्या खर्चात मोठी बचत होते. परिणामी उत्पादन खर्चात बचत आणि उत्पादनात तसेच उत्पन्नात वाढ होते.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमूद करू इच्छितो की नामधारी 4266 वाण चंद्रशेखर आझाद कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, कानपूर, उत्तर प्रदेश येथील शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. निश्चितच या जातीची लागवड उत्तर प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे. मात्र इतर राज्यात देखील काळाच्या ओघात या जातीची लागवड होण्याची शक्यता आहे.
नामधानी 4266 जातीच्या लागवडीचा खर्च
कृषी शास्त्रज्ञांच्या मते, पॉलिहाऊसमध्ये या प्रगत जातीच्या टोमॅटोची लागवड करण्यासाठी 50,000 रुपयांपर्यंतचा संपूर्ण खर्च येतो. याच्या लागवडीसाठी मऊ आणि उष्ण हवामान चांगले असते, परंतु सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत या जातीची रोपे पॉलिहाऊसमधील रोपवाटिकेत तयार केली जातात, ज्याच्या लागवडीनंतर डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंत टोमॅटोचे रोगमुक्त फळांचे बंपर उत्पादन मिळते.
कमी वेळेत बंपर उत्पन्न
जाणकार लोक दावा करतात की या जातीच्या टोमॅटोला खूपच कमी पाणी लागते. नामधारी 4266 जातीच्या टोमॅटोची लागवड करताना जास्त पाणी खर्च होत नाही. यामुळे पाण्याची बचत होणार आहे. शेतकर्यांनी टोमॅटो पिकाला ठिबक सिंचनाचा वापर केला तरी देखील या जातीच्या टोमॅटोतुन चांगले उत्पादन शेतकरी बांधवांना घेता येणार आहे.
टोमॅटोचे सामान्य वाण 400 ते 600 क्विंटल उत्पादन देते, तर नामधारी 4266 जातीचे उत्पादन 1200 ते 1400 क्विंटल कमी खर्चात मिळते.
एकीकडे, टोमॅटोच्या सामान्य जातींचे वजन फक्त 50 ते 80 ग्रॅम असते. दुसरीकडे नामधारी 4266 जातीच्या टोमॅटोचे वजन 100 ते 150 ग्रॅम आहे.
या जातीच्या एका झाडावर 50 ते 60 फळे आणि प्रत्येक घडावर 4 ते 5 टोमॅटोची फळे आढळतात.
निश्चितच शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या या जातीच्या टोमॅटो पिकातून शेतकरी बांधवांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे अवघ्या 45 दिवसात शेतकरी बांधवांना चांगली कमाई होणारं आहे.