Tomato Farming: भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेतकरी बांधव (Farmer) अल्प कालावधीत आणि कमी खर्चात काढणीसाठी तयार होणा-या भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Vegetable Farming) करत आहेत. राज्यातील शेतकरी बांधव देखील अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळवण्यासाठी भाजीपाला वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेती करत असतात.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना पारंपारिक पिकासमवेत भाजीपाला वर्गीय पिकांची शेती (Farming) करण्याचा सल्ला देत असतात. मित्रांनो टोमॅटो (Tomato Crop) हे देखील प्रमुख भाजीपाला वर्गीय पीक आहे.
याची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. विशेष म्हणजे टोमॅटो पिकाची शेती (Tomato Cultivation) शेतकरी बांधवांना चांगली फायदेशीर देखील ठरत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी टोमॅटो पिकाला चांगला बाजारभाव (Tomato Rate) मिळत असल्याने राज्यातील अनेक शेतकरी बांधवांना लाखों रुपयांची कमाई झाली.
यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात टोमॅटो या भाजीपाला पिकाची शेती करणार असल्याचे चित्र आहे. टोमॅटो पिकाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे याचे पीक अल्पकालावधीत काढण्यासाठी तयार होते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव देखील या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करू लागले आहेत.
यामुळे आज आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी टोमॅटोची एका सुधारित जातीची (Tomato Variety) माहिती घेऊन हजर झालो आहोत. टोमॅटोची ही सुधारित जात शेतकरी बांधव पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा अशा तिन्ही ऋतूंमध्ये उत्पादित करू शकणार आहेत.
अर्थातच टोमॅटोची ही जात खरीप रब्बी आणि उन्हाळी या तिन्ही हंगामांत लावता येणार असल्याने शेतकरी बांधवांना यातून चांगले अतिरिक्त उत्पन्न कमवता येणार आहे. मित्रांनो आम्ही ज्या टोमॅटोच्या जाती बद्दल बोलत आहोत ती जात आहे अर्का अपेक्षा (F1).
अर्का अपेक्षा (F1) जातीची विशेषता
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, टोमॅटोची ही सुधारित जात टोमॅटो लीफ कर्ल रोग (Ty1+Ty2), बैक्टीरियल विल्ट और अर्ली ब्लाइट या रोगासाठी तिप्पट प्रतिकारशक्ती असलेली जात आहे. साहजिकच या जातीला जास्त कीटकनाशक फवारणी करण्याची गरज भासणार नाही.
यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत होणार आहे. या जातीची झाडे गडद हिरव्या पर्णसंभाराने अर्ध-निर्धारित असतात. या जातीपासून मिळणारे टोमॅटो फळ कडक, गडद लाल, आयताकृत्ती, मध्यम ते मोठे असतात. या जातीच्या टोमॅटो फळाचे वजन 100 ग्रॅमपर्यंत असल्याचा दावा केला जातो.
या टोमॅटोला (j2) देठ नसतात. फळे प्रक्रियेसाठी योग्य आहेत कारण त्यात TSS (4.7° Brix), आम्लता (0.36%), लाइकोपीन (14.15mg/100g ताजे वजन) असते. उन्हाळी, खरीप आणि रब्बी अशा तिन्ही हंगामात या जातीच्या लागवडीची शिफारस केली गेली आहे.
140-150 दिवसांत त्याची उत्पादन क्षमता 43 ते 90 टन प्रति हेक्टर आहे. निश्चितच ज्या शेतकरी बांधवांना टोमॅटोची लागवड करायची असेल ते शेतकरी बांधव या जातीचा एकदा अवश्य विचार करू शकतात.