Tractor News : मित्रांनो अलीकडे भारतीय शेतीत (Agriculture) मोठा आमूलाग्र बदल झाला आहे. आता शेतकरी बांधव (Farmer) शेती कसण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांचा वापर करू लागला आहे. यामध्ये ट्रॅक्टरचा (Tractor) देखील समावेश आहे.
ट्रॅक्टरचा उपयोग पेरणीपासून ते काढणीपर्यंत एवढेच नाही तर पेरणीपूर्व मशागतीसाठी देखील केला जातो. शेतमालाची काढणी झाल्यानंतर वाहतुकीसाठी देखील ट्रॅक्टर चा उपयोग होत असतो. अशा परिस्थितीत ट्रॅक्टर हा आता बळीराजा चा खरा सोबती बनला आहे.
पूर्वी बैलाला बळीराजाचा सवंगडी म्हणत असत मात्र आता बैलाची जागा ट्रॅक्टर ने घेतली असल्याने ट्रॅक्टरलाच आता बळीराजाचा सोबती म्हणावं लागणार आहे. शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील शेतीसाठी शक्तिशाली आणि किफायतशीर ट्रॅक्टर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची ही विशेष बातमी तुमच्यासाठी आहे.
मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी सोनालिका कंपनीच्या एका ट्रॅक्टरविषयी (Sonalika Tractor) माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण सोनालिका आरएक्स 42 महाबली ट्रॅक्टर (Tractor Information) विषयी सविस्तर पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला कमी बजेटमध्ये सर्वोत्तम ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर सोनालिका कंपनीचा rs42 महाबली हा आपल्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय सिद्ध होणार आहे.
या ट्रॅक्टरच्या साहयाने शेतकरी बांधवांना शेतीची छोटी-मोठी कामे सहज पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. सोनालिका आरएक्स 42 महाबली शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया सोनालिका आरएक्स 42 महाबली या ट्रॅक्टर विषयी सविस्तर.
सोनालिका RX 42 महाबली ट्रॅक्टरची इंजिन क्षमता
सोनालिका RX 42 महाबली हा 3 सिलेंडर आणि RPM 2000 रेट असलेला 42 HP चा ट्रॅक्टर आहे. याशिवाय एअर फिल्टरसाठी ड्राय टाईप देण्यात आला आहे.
सोनालिका RX 42 महाबली ट्रॅक्टरची खास वैशिष्ट्ये
सोनालिका आरएक्स 42 महाबली ट्रॅक्टर सिंगल आणि ड्युअल क्लचसह देण्यात आला आहे. शेतकरी गरजेनुसार त्याचा वापर करू शकतात. हा ट्रॅक्टर 10 फॉरवर्ड + 5 रिव्हर्स गियरसह येतो. या ट्रॅक्टरला ऑईल ब्रेक आहेत जे त्यास मजबूती आणि शेतातील कामात कमी घसरण्यास मदत करतात. हे तुम्हाला उत्कृष्ट पॉवर स्टीयरिंगसह दिले आहे.
या सोनालिका ट्रॅक्टरची डिझेल टाकी क्षमता 55 लिटर आहे. तसेच या ट्रॅक्टरला 540 RPM देण्यात आले आहे, ज्यामुळे तो एक प्रभावी ट्रॅक्टर बनला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सोनालिका आरएक्स 42 महाबली ट्रॅक्टरचे कमाल वजन 1800 किलो पर्यंत आहे. हा ट्रॅक्टर 2WD व्हील ड्राइव्हसह येतो, ज्यामुळे तो बराच काळ शेतात व्यवस्थित काम करू शकतो.
सोनालिका आरएक्स 42 महाबली ट्रॅक्टरची किंमत
मित्रांनो सोनालिका कंपनीचा हा ट्रॅक्टर शेतकरी बांधवांना उत्तम फिचर्स सोबत कमी किमतीत उपलब्ध होतो. यामुळे शेतकरी बांधवांना कमी बजेटमध्ये हा ट्रॅक्टर खरेदी करता येणार असून शेतीकाम देखील या ट्रॅक्टरच्या साह्याने जलद गतीने पूर्ण होणार आहेत. सोनालिका आरएक्स 42 महाबली ट्रॅक्टरची भारतीय बाजारपेठेत किंमत 5.45 लाख ते 5.80 लाख दरम्यान आहे.