Tractor News : स्वराज ही भारतातील ट्रॅक्टर निर्माती एक अग्रगण्य कंपनी (Tractor Company) आहे. ही एक स्वदेशी ट्रॅक्टर कंपनी आहे. ही केवळ देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी ट्रॅक्टर कंपन्यांपैकी एक आहे. आपल्या देशात लाखो शेतकरी स्वराज ट्रॅक्टर वापरतात. स्वराज ट्रॅक्टर (Swaraj Tractor) अतिशय शक्तिशाली, किफायतशीर आणि मजबूत आहेत.
स्वराज ट्रॅक्टरची किंमतही (Swaraj Tractor Price) खूपच कमी आहे. हेच कारण आहे की स्वराज ट्रॅक्टर हा भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या ट्रॅक्टरपैकी (Tractor Information) एक आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, स्वराज कंपनी 20 HP ते 80 हॉर्स पॉवरच्या रेंजमध्ये ट्रॅक्टर बनवते.
किंमतीबद्दल बोलायचे झाले तर स्वराज ट्रॅक्टरची किंमत अडीच लाखांपासून सुरू होऊन 20 लाखांपर्यंत असते. अशा परिस्थितीत आज आपण स्वराज कंपनीच्या तीन ट्रॅक्टर विषयी (Top Tractor In India) जाणून घेणार आहोत.
स्वराज 724 एक्सम :- हे 25 एचपी चे एक कमी बजेट मध्ये सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टर मध्ये दोन सिलिंडर देण्यात आले आहेत. या ट्रॅक्टरला 1824 सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. हा ट्रॅक्टर टू व्हील ड्राइव आहे. या ट्रॅक्टर मध्ये आठ गेअर पुढे आणि दोन रिव्हर्स साठी आहेत. या ट्रॅक्टरची करण्याची क्षमता 1000 किलो एवढी आहे. या ट्रॅक्टरची किंमत 3.75 लाख आहे.
स्वराज 855 डीटी प्लस :- हे 52 एचपीचे स्वराज कंपनीचे सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टर मध्ये तीन सिलेंडर आणि दोन हजार सीसी इंजिन देण्यात आले आहे. हे ट्रॅक्टर टू व्हील ड्राईव्ह आहे. ट्रान्समिशन बद्दल बोलले तर पुढे 8 गियर आणि रिवर्ससाठी दोन गियर आहेत. हे ट्रॅक्टर 1700 किलो वजन उचलण्यास सक्षम आहे. या ट्रॅक्टरची किंमत 7.35 ते 7.80 एवढी आहे.
स्वराज 735 एफई :- स्वराज कंपनीचा हा एक उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे. हा 40 एचपीचा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टर मध्ये तीन सिलेंडर आहेत आणि 2734 सीसीचे इंजिन आहे. हा ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टर प्रमाणेच टू व्हील ड्राईव्ह आहे. पुढे आठ गेअर आणि रिव्हर्स साठी दोन गियर देण्यात आले आहेत. या ट्रॅक्टरची किंमत 5.50 ते 5.85 एवढी आहे.