अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Krushi News :- शेतकऱ्याच्या शेतातील रब्बी हंगामातील पीक हे विक्रीसाठी बाजार समितीत येऊ लागली आहे. तर त्याला बाजारात आवक देखील चांगली आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात बाजार समित्या माल आणण्यास सुरुवात केली होती त्यात आता होळीच्या सणानिमित्त बाजार समित्या बंद राहणार आहेत.
मध्यंतरीच्या काळात दिवाळीच्या सनातही बाजारपेठेचे व्यवहार काही दिवस बंद होते. तर आता होळी मुळे ही बाजारपेठा बंद राहणार आहे.
त्यामध्ये काही बाजारपेठ 2 दिवसासाठी तर काही बाजारपेठ 5 दिवसांसाठी बंद ठेवण्याचे बाजार समित्यांना ठरवली आहे.
तर यामध्ये पणन महामंडळाचा महत्वाची भूमिका असते पण स्थानिक पातळीवर हा निर्णय बाजार समिती प्रशासनच घेते. राज्यातील लासलगाव, सोलापूर, मालेगाव, नाशिक, लातूर या बाजार समित्या दरवर्षी होळीनिमित्त बंद असतात.
तर पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांचे व्यवहार सुरूच राहणार आहेत. बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाची गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांनी घेतला आहे.
तर सणामुळे बंद असणाऱ्या बाजार समित्यांमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीन, हरभरा आणि तुरीची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाची काही दिवस गैरसोय होणार असून बाजार समित्या चालू झाल्यानंतर त्या मालाचे दर तेच राहणार आहेत की बदलणार आहेत हे पाहाणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.