कृषी

Tur Rate : तूर उत्पादक शेतकरी होणारं मालामाल! ऑक्टोबरपर्यंत तुरीचे दर 11 हजारांच्या घरात जाण्याची शक्यता

Tur Rate : भारतात तुरीची लागवड (Tur Farming) मोठ्या प्रमाणात केली जाते. राज्यात देखील तूर लागवडीखालील (Tur Cultivation) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव (Farmer) तूर पिकावर (Tur Crop) अवलंबून असतात.

राज्यातील तुर उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Tur Grower Farmer) एक दिलासादायक बातमी देखील आता समोर येत आहे. खरं पाहता सध्या तुरीला अपेक्षित असा बाजार भाव (Tur Market Price) मिळत नसल्याचे चित्र आहे. तुरीला सध्या सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. मात्र असे असले तरी आगामी काही काळात तुरीच्या दरात (Tur Price) वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे.

जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या राज्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीची आवक लक्षणीय कमी झाली आहे. भारतातील इतरही प्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तुरीची आवक (Tur Arrival) घटली आहे. शिवाय देशात सध्या तुरीची उपलब्धता देखील कमी आह.

हाती आलेल्या माहितीनुसार देशात तुरीचा 6 लाख टन साठा शिल्लक आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात तुरीची मागणी वाढणार आहे. त्यामुळे बाजारात दाखल होणार्‍या नवीन तुरीला चांगला बाजार भाव मिळणार असल्याची शक्यता आहे. जाणकार लोकांच्या मते बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या तुरीला अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा दर मिळू शकतो. सध्या बाजारात सात हजार ते साडेसात हजार रुपये प्रतिक्विंटल तुरीला दर मिळत आहे.

म्हणजेज आगामी काही दिवसात तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत तुरीच्या दरात सुधारणा होणार असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तूरीच्या बाजारभावात वाढ होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला गेला असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, सध्या तुरीची आवक संपूर्ण देशात कमी झाली आहे.

तसेच बाजार भाव देखील कमी असल्याने अनेक शेतकरी बांधव तुरीची विक्री  करत नसल्याचे चित्र आहे. तसेच तुरीचा साठा देखील अत्यल्प शिल्लक राहिला असल्याने आगामी काही दिवसात तुरीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे निश्चितच उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts