कृषी

Agriculture News : विखे पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले ! आता शेतकऱ्यांची मागणी गाव तिथे…

Agriculture News : सतत बदलते हवामान, त्यामुळे वेळी अवेळी पडणारा पाऊस कधी पिकांना बुस्टर ढोस देतो, तर कधी पिकांची नासाडी करून वाताहत करतो. याची शेतकऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागते. त्यात अनेक गावे मिळून एक पर्जन्यमापक यंत्र आहे.

अतिवृष्टीने नुकसान होऊनही केवळ मंडळातील पर्जन्यमापक तंत्रावर या पावसाची नोंद होत नाही, परिणामी शासनाच्या आर्थिक मदतीला मुकावे लागते. त्यामुळे गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र बसवावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

गेल्या चार-पाच वर्षांत निसर्गाची शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी पडली आहे. कधी महापूर तर कधी आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पहात थकलेला बळीराजा हे समीकरण बदलण्यास तयार नाही. त्यात जीवाचे रान करून ही जेमतेम पावसावर आलेली पिके काढणीच्या तयारीत असताना, अतिवृष्टी नोंद पाचवीला पुजलेली असते.

त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो. त्यामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त होतो; मात्र केवळ ठराविक गावे मिळून परिसरात असलेले मंडळातील पर्जन्यमापक यंत्र सरासरीपेक्षा कमी पावसाची होत असल्याने ज्या ठिकाणी नुकसान झाले, त्या शेतकरी वर्गाच्या फक्त आक्रोश वाट्याला येतो.

त्यामुळे पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होऊनही त्यांची भरपाईपासून अनेक शेतकरी वंचित राहतात. परिणामी गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र हवे. असे झाल्यास नुकसानग्रस्त शेतकरी वर्गास त्याची शासनाकडून नुकसानभरपाई मिळण्यास मोठा हातभार लागेल.

मागील वर्षी राहाता तालुक्यातील पुणतांबा परिसरातील बहुतेक गावांतील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसून पिकांचे नुकसान झाले; पण मंडळात सरासरी पर्जन्यमान अपेक्षित असलेली नोंद नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला.

गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र असते, तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता; मात्र स्पेशल बाब म्हणून मागील महिन्यात ना. विखे पाटील यांनी या मंडळातील शेतकऱ्यांना निधी मिळवून दिला. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री झाल्यानंतर शेतकरी हिताचे अनेक योग्य निर्णय घेतले आहे. गाव तेथे पर्जन्यमापक यंत्र बसविण्यासाठी त्यांनी लक्ष घालावे व शेतकरी वर्गाची अडचण दूर करावी, अशी मागणी होत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts