कृषी

Success: ‘या’ तरुणासाठी मशरूम शेती ठरली वरदान; ऑयस्टर मशरूम लागवड करून कमवतोय लाखों

Success Story: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) म्हणजेच देशातील बहुसंख्य लोक हे शेती क्षेत्रावर (Farming) अवलंबून आहेत. देशातील शेतकरी बांधव (Farmers) आता काळाच्या ओघात चांगला अमुलाग्र बदल करून नेत्रदीपक यश संपादन करत असल्याचे बघायला मिळत आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोक देखील शेतकरी बांधवांना काळाच्या ओघात बदल करण्याचा सल्ला देत असतात. अशाच एका बदला पैकी एक बदल आहे पीक पद्धतीचा बदल. पीकपद्धतीत बदल केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात (Farmers Income) वाढ होत आहे.

उत्तराखंड राज्यातील नैनिताल जिल्ह्यातील हल्दवानी येथील एका नवयुवक शेतकऱ्याने देखील मशरूम शेतीची (Mushroom Farming) कास धरत लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. आज आपण या नवयुवकाविषयी व त्याने केलेल्या शेती व्यवसायात अभूतपूर्व कामाबद्दल जाणून घेणार आहोत.

नैनिताल जिल्ह्यातील फतेहपूर, हल्द्वानी येथे राहणारा यश वर्मा ऑयस्टर मशरूमची लागवड (Oyster Mushroom Cultivation) करत आहे. जे पूर्णपणे सेंद्रिय (Organic Farming) तसेच पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे, हे औषधी असल्याने बाजारात चढ्या भावाने विकले जात आहे. ऑयस्टर मशरूम हे बटन मशरूमपेक्षा (Button Mushroom) वेगळे आहे, त्याला उत्तराखंडच्या स्थानिक भाषेत धिंगरी मशरूम असेही म्हणतात.

मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बाजारांमध्ये बटन मशरूम पाहिला असेल. पण आता बटन मशरूम तसेच ऑयस्टर मशरूमचे देखील उत्पादन घेतले जातं आहे. ज्यांची मागणी आता बाजारात वाढली आहे.

ऑयस्टर मशरूमला प्रोत्साहन देण्यासाठी आता उद्यान विभागही तरुणांना प्रोत्साहन देत आहे. हल्द्वानीच्या फतेहपूर भागात राहणारे यश वर्मा यांनी बटन मशरूमसोबत ऑयस्टर मशरूमची लागवड सुरू केली आहे. जिथे तो स्वत:ला स्वावलंबी बनवण्याबरोबरच इतरांनाही रोजगार देत आहे.

साधारणतः तुम्ही हे पाहिले असेल की बटण मशरूम बाजारात 200 रुपये किलोपर्यंत विकले जाते. पण ऑस्टर मशरूम औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे, ज्याला बाजारात खूप मागणी आहे आणि बाजारात ती 200 ते 300 रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. त्याची पावडर आणि लोणचेही वाळवून बनवले जात आहे. जे बाजारात 1000 रुपये ते 1200 रुपये प्रति किलो या दराने विकले जात आहे.

कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, ऑयस्टर मशरूम हळूहळू लोकांची पहिली पसंती बनत आहे. कारण त्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे आता त्याची मागणी वाढली आहे. इतर मशरूमच्या तुलनेत, ते चव आणि पौष्टिकतेने समृद्ध आहे, ज्यामुळे मोठ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये याला खूप मागणी आहे. अशा परिस्थितीत, जो कोणी त्याची लागवड करत असेल, तो त्याचे उत्पादन थेट रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्समध्ये देऊ शकतो, जिथे त्यांना त्याचा चांगला भाव मिळतो.

यश वर्मा याने देखील ऑईस्‍टर मशरूमची शेती करून चांगला बक्कळ नफा कमवला आहे. निश्चितच काळाच्या ओघात शेती व्यवसायात बदल केल्यास शेतकऱ्यांना यातून चांगला फायदा मिळू शकतो. शिवाय शासनही शेतकऱ्यांना शेती व्यवसायात बदल करण्यासाठी प्रोत्साहित करणे हेतू वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करीत असते. 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts