विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. यामध्ये गारपीट, वादळी वारे तसेच अवकाळी व अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्ती तर बऱ्याचदा हातात आलेले शेती उत्पादन हिरावून घेतात व त्यामुळे शेतकऱ्यांना फार मोठे आर्थिक संकटाला समोर जावे लागते. नैसर्गिक आपत्ती सोबतच विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचा धोका देखील शेतीपिकांना असतो. बऱ्याचदा हरणीचे कळप, रानडुकरांसारखे वन्यप्राणी शेती पिकांचे अतोनात नुकसान करतात.
त्यामुळे देखील शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होऊ नये याकरिता शेतकरी विविध उपायांचा अवलंब करतात. परंतु हव्या त्या प्रमाणात त्याचा परिणाम दिसून येत नाही. परंतु या दृष्टिकोनातून जर आपण शॉक मशीन चा म्हणजे झटका मशीनचा विचार केला तर हे पिकांचे वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा अनुषंगाने झटका मशीन बद्दल महत्वाची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.
झटका मशीन म्हणजे काय?
झटका मशीन वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होण्यापासून बचाव करणारे एक महत्त्वपूर्ण यंत्र असून यामध्ये साधारणपणे 12 होल्टचा विद्युत प्रवाह निर्माण होत असतो. झटका मशीनची रचना पाहिली तर यामध्ये अर्थिंग तार आणि दुसरी विद्युत प्रवाह तर अशा दोन प्रकारच्या तारा असतात. या तारांचा वापर करून शेताच्या सभोवती तारांचे कुंपण घालतात व बॅटरीच्या माध्यमातून विद्युत प्रवाह दिला जातो.
यामध्ये तारेचे कुंपण शेतीला दिल्यामुळे जर एखाद्या प्राण्याचा किंवा व्यक्तीचा स्पर्श देखील या तारेला झाला तर त्याला जोराचा शॉक लागतो. हीच प्रक्रिया वन्यप्राणी पिकांपासून दूर पळवण्यासाठी उपयोगी येते. तसेच काही झटका मशीन मध्ये सायरनची सुविधा देण्यात आली आहे व यामुळे जर एखाद्या प्राण्याने तारेच्या कुंपणाला स्पर्श केला तरी या यंत्रामध्ये असलेला सायरन जोरात वाजतो व शेतकऱ्यांना कळते की पिकामध्ये वन्य प्राणी शिरले आहेत.
अशा पद्धतीने बसवले जाते झटका मशीन
झटका मशीन शेतामध्ये बसवायचे असेल तर त्याकरिता अगोदर संपूर्ण शेतीच्या आजूबाजूला कुंपण करणे गरजेचे आहे. त्यानंतर या कुंपणाच्या तारा शॉक मशीनला म्हणजे झटका मशीनला कनेक्ट केलेले असतात. त्यामुळे या तारांना किंवा कुंपणाला स्पर्श करताच प्राण्यांना विजेचा धक्का बसतो.
तसेच यामध्ये सोलर झटका मशीन हा एक प्रकार असून तो संपूर्णपणे सौर उर्जेवर कार्यान्वित असतो. यामध्ये असलेली बॅटरी चार्ज करण्याकरिता सौर पॅनल असतात व ते सूर्याच्या उर्जेचा वापर बॅटरी चार्ज करण्यासाठी केला जातो. त्यानंतर बॅटरीच्या माध्यमातून झटका मशीनला करंट दिला जातो व सौर झटका मशीन कार्यान्वित होते.
झटका मशीन कुठून खरेदी करता येईल?
तुम्ही एखाद्या कृषी सेवा केंद्र किंवा ज्या ठिकाणी शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य विकले जाते अशा हार्डवेअरच्या दुकानावर देखील हे झटका मशीन मिळते. तसेच तुम्ही याला ऑनलाईन पद्धतीने देखील ऑर्डर करून मागवू शकतात.
किती आहे झटका मशीनची किंमत?
झटका मशीनची किंमत साधारणपणे 3500 रुपयांपासून सुरू होते तर दहा हजार पर्यंत हे मशीन मिळते. साधारणपणे झटका मशीनची कंपनी तसेच त्यात वापरण्यात आलेले तंत्रज्ञान व त्याचा दर्जा यावर किंमत अवलंबून असते. यामध्ये बॅटरीवर चालणारे झटका मशीन देखील मिळते व त्याची बॅटरी बारा वॅटची असते. या झटका मशीनची किंमत एक ते दोन हजार रुपयांपर्यंत असते.
झटका मशीन वापरताना ही काळजी घ्यावी?
शेतात झटका मशीन बसवल्यानंतर त्याची वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे. कधी कधी यामधून विजेचा शॉक लागून माणसांचा किंवा प्राण्याचा मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे मशीन वापरताना खूप जपून वापरणे गरजेचे आहे व लक्ष ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे.