रस्त्यासाठी १ कोटी रुपयाचा निधी मंजूर: राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :-‘वांबोरी’ हा माझ्या मतदारसंघाचा कणा आहे, त्यामुळे येथील जनतेला मी कायम झुकते माप दिले, पोटे वस्ती रस्ता, पांगिरे वस्ती, इदगाह मैदान भिंत तसेच, सुमारे १ कोटी रुपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला.

त्यांच्या विविध मागण्या पूर्ण केल्या आणि मंत्रिपदाच्या माध्यमातून विविध पायाभूत सुविधा देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ग्रामपंचायतीला भेट देऊन राज्यमंत्री तनपुरे यांनी उपस्थित नागरिकांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विकास कामांची माहिती दिली. ‘वांबोरी येथील विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सुमारे १० ट्रान्सफॉर्मरची जोडणी करायची आहे.

त्यातील ५ ट्रान्सफॉर्मर बसवले, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. तसेच नागरीकांसाठी पाणीपुरवठा आणि इतर अडचणी सोडवणयासाठी प्रयत्नशील आहे, कोरोनामुळे काही विकासकामे रखडली होती. मात्र त्या कामाचा पाठपुरावा करून लवकरच ती कामे मार्गी लावू, असे श्री. तनपुरे म्हणाले.

तीन डीपीचे उद्घाटन :- राहुरी तालुक्यातील मोरे वाडी येथील डीपीवर ग्राहकांचे अतिरीक्त कनेक्शन असल्यामुळे वारंवार विज पुरवठा खंडीत व्हायचा. त्यामुळे तेथील नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागायचा.

मोरे वाडी येथील सातभाई डीपीवरचा भार कमी करण्यासाठी नवीन डीपी बसविण्यात आले. तसेच पाथर्डी तालुक्यातील दत्ताजी शिंग्रे येथील सहामोरे डिपीचे उद्घाटन उर्जा राज्यमंत्री तुनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे आता नागरिकांना सुरळीत वीज पुरवठा होणार आहे.

पटारे वस्तीवरील नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे शेतकऱ्यांच्या पिकांना नियमीत वेळी पाणी देता येणार आहे तसेच पीक वाचून उत्पादनक्षमता वाढणार आहे. यावेळी बाबासाहेब भिटे, सुरेश बाफना, किसन जवरे, नितीन बाफना, कृष्णा पटारे आदींची उपस्थिती होती.

शंकर मोरे वस्ती ते विळद रस्त्याचे लोकार्पण :- राज्यमंत्री श्री. तनपुरे यांच्या प्रयत्नांमुळे राहुरी तालुक्यातील वांबोरी गावामध्ये शंकर मोरे वस्ती ते विळद रोड या १३०० मीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आले.

या रस्त्याचे लोकार्पण श्री. तनपुरे यांच्या हस्ते झाले. पूर्वी रस्ता खराब असल्यामुळे दुग्ध व्यवसाय, कांदे उत्पादक शेतकरी यांना मालाची ने-आण करणे अवघड जात होते. रस्त्यांचे काम पुर्ण झाल्यामुळे आता शेतकऱ्याचा प्रवास सुखकर होणार आहे.*

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts