ताज्या बातम्या

कोरोना लसीचे १० कोटी डोस वाया, कारण…

 corona news:पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीचे सुमारे दहा कोटी डोस वाया केले आहेत. लसीकरणासंबंधी उदासिनता आल्याने हे डोस पडून राहिले.

त्यामुळे ते मुदतबाह्य होऊन वाया गेले, अशी माहिती माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी दिली. पुनावाला यांनी सांगितले की, कोरोननाची लाट ओसरल्यावर नागरिकांमध्ये लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत उदासीनता आली.

आम्ही डिसेंबर २०२१ मध्ये कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन थांबवले. तरीही कोव्हिशिल्ड लसीचे १० कोटी डोस कालबाह्य झाल्याने वाया गेले. कोरोना लसीपेक्षा फ्लू लसीकरणाविषयी अधिक उदासीनता आहे.

आम्ही स्वाइन फ्लूच्या सुरुवातीलाच फ्लूवरील लस तयार केली होती. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. दरवर्षी किंवा दर दोन वर्षांनी कोरोना आणि फ्लूची लस नियमितपणे घ्यावे लागेल.

कोव्होव्हॅक्सचा वापर बूस्टर म्हणून करण्यास १०-१५ दिवसांत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. एचपीव्हीसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधा कोरोनासाठी वापरण्यात आली. लसीचे उत्पादन सुरुवातीला कमी प्रमाणात करण्यात येत आहे. २०२३ मध्ये एका वर्षात २ कोटी डोस उत्पादित केले जातील.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts