अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.
मात्र तरीही कोरोनाची आकडेवारी आटोक्यात येत नसल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात 10 दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यात 5 मे पासून 14 मे पर्यंत श्रीगोंदा तालुक्यातील जनतेने स्वयं स्पूर्तीने जनता कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती श्रीगोंद्याचे तहसीलदार प्रदीप पवार यांनी दिली.
राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या परिस्थितीत श्रीगोंदा तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहेत.
गेल्या आठवडाभरात 1000 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण वाढत आहेत.यामुळं प्रत्येक गावातील ग्रामसेवक, सरपंच व सदस्य यांच्या सोबत चर्चा केली.
जनता कर्फ्यूच्या काळात 11 वाजेपर्यंत किराणा व भाजी विक्री साठीं होम डिलिव्हरीला परवानगी देण्यात येणार आहे.
तर अत्यावश्यक सेवा मध्ये समाविष्ट असलेले मेडिकल, हॉस्पिटल, दूध संकलन,पाणी,पेट्रोल पंप (अत्यावश्यक सेवा) इत्यादी गोष्टी सुरू राहणार आहेत.