Realme GT Neo 3T : रियलमीचा (Realme) सर्वात स्वस्त स्मार्टफोन (Realme smartphone) भारतात लाँच झाला आहे. अनेक दिवसांपासून ग्राहक या स्मार्टफोनची (Smartphone) आतुरतेने वाट पाहत होते.लाँचपूर्वीच या ब्रॅंडने ऑफरची (Realme offer) घोषणा केली होती.
6 जीबी + 128 जीबी मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे, फ्लिपकार्टवर (Flipkart) 7,000 रुपयांच्या सवलतीसह 22,999 रुपयांना उपलब्ध होईल.
त्याच वेळी, सवलतीशिवाय 8 GB + 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 31,999 रुपये आहे आणि 8 GB + 256 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 33,999 रुपये आहे.
आता Realme GT Neo 3T च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास तर हा स्मार्टफोन 80W सुपर डार्ट चार्जिंगसह उपलब्ध परवडणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे. हा स्मार्टफोन (Realme GT Neo 3T Smartphone) रेसिंग फ्लॅग डिझाइनसह येतो.
हे स्नॅपड्रॅगन 870 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्मार्टफोनला स्टेनलेस स्टील आणि आणखी एक कूलिंग सिस्टीम प्लस देण्यात आला आहे, मागील बाजूस एक ट्रिपल रिअर कॅमेरा आहे, ज्यामध्ये 8 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स 64 मेगापिक्सेल प्राथमिक सेन्सर आहेत.
स्मार्टफोन AMOLED E4 डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. त्याच वेळी, यात 80W सुपर डार्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे. असे म्हटले जात आहे की, ते फक्त 12 मिनिटांत 0-50% पर्यंत चार्ज होते.