ताज्या बातम्या

पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा ! राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांच्या याद्या केल्या केंद्राकडे सपूर्द

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Krushi news :- पीएम किसान योजनेचा 11वा हप्ता कधी जमा होणार याची शेतकरी प्रतीक्षा करत होते. मात्र त्याची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. केंद्र सरकारकडून आता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रक्कम जमा केली जाऊ शकते.

मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये रक्कम जमा होऊ शकते. त्यासाठी केंद्र सरकार कडून अक्षय तृतीया चा मुहूर्त साधला जाऊ शकतो.

कारण यापूर्वी 10 वा हप्ता हा नववर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आला होता. म्हणून आता 11व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारकडून अक्षय तृतीया चा मुहूर्त साधला जाऊ शकतो.

ही जरी योजना केंद्र सरकारची असली तरी राज्यातील यंत्रणेच्या आधारे लाभार्थी शेतकरी ठरवून 11व्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची यादी केंद्राकडे राज्य सरकारकडून सपूर्द करण्यात आली आहे.

पीएम किसान योजनेचा 11 वा हप्ता जमा होऊन चार महिने झाली तरीही 11 व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नव्हते. कारण काही अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनात आले होते.

तर पात्र शेतकरी मात्र या योजनेपासून वंचित राहिले होते. त्यामुळे शासनाकडून पात्र शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आली आहे.

त्यासाठी सरकारकडून 31 मे ही मुदत देण्यात आली असून ही प्रक्रिया CSC केंद्र किंवा लाभार्थ्याचे ज्या बँकेत खाते आहे तिथे ही प्रक्रिया शेतकऱ्याला पुर्ण करता येणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts