ताज्या बातम्या

PM Kisan Yojana: PM किसान योजनेचा 12वा हप्ता ‘या’ दिवशी येणार, जाणून घ्या कोणाला मिळणार नाही 12 वा हप्ता?

PM Kisan Yojana: भारत सरकार (Government of India) गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध योजना राबवत आहे, ज्यात पीएम किसान योजना (PM Kisan Yojana) किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा समावेश आहे.

या योजनेच्या माध्यमातून गरीब शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial assistance to poor farmers) केली जाते. या योजनेद्वारे कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ठराविक रक्कम थेट जमा केली जाते. दरवर्षी करोडो शेतकरी (crores of farmers) या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत असतात.

ऑगस्ट-नोव्हेंबर 2022 चा 12 वा हप्ता महत्त्वाचा का आहे? –

वास्तविक, पीएम किसान योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 11 हप्ते गरीब शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहेत, आता 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

ऑगस्ट ते नोव्हेंबर 2022 पर्यंतचा हा 12 वा हप्ता शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण मुसळधार पावसाने अनेक राज्यांमध्ये कहर केला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोर आर्थिक मदत अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

या शेतकऱ्यांना 12 वा हप्ता मिळणार नाही –

– जर एखाद्या शेतकऱ्याने ई-केवायसी (e-KYC) केली नसेल, ज्याची अंतिम तारीख 31जुलै होती.
– ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना चुकीचा डेटा भरला आहे.
– शेतकऱ्याच्या आधार कार्ड (aadhar card) आणि फॉर्ममधील नावाचे स्पेलिंग चुकीचे असल्यास.
– बँक खात्याची माहिती बरोबर नाही.
– ज्यांनी या योजनेसाठी चुकीच्या पद्धतीने अर्ज केले आहेत.

फसवणूक करणाऱ्यांना हप्त्याचे पैसे परत द्यावे लागतील –

अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा बेकायदेशीरपणे फायदा घेत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हे करणार्‍यांवर सरकार कडक झाले आहे. सरकारकडून अशा लोकांना पैसे परत करण्यासाठी नोटीस पाठवली जात आहे. तत्काळ पैसे परत न केल्याने या लोकांवरही कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts