अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकित उमेदवारी मागे घेण्याच्या अंतिम मुदती पर्यंत २१ जागांपैकी ऐकून १७ जागा बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
यात सेवा सोसायटी मतदार संघातील ११, महिला प्रतिनिधींच्या २ आणि शेती पूरक प्रक्रिया, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग अनुसूचित जाती/ जमाती प्रत्येकी एक जागांचा समावेश आहे.उर्वरित चार जागांसाठी निवडणूक होणार असून यात सोसायटी मतदार संघातील नगर,
कर्जत व पारनेर या तीन आणि बिगर शेती संस्था मतदार संघातील एका जागेचा समावेश आहे.माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, अंबादास पिसाळ, उदय शेळके, दत्तात्रय पानसरे व मिनाक्षी साळुंके पाच विद्यमान संचालकांना निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळ निवडणूकीच्या उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा बँक निवडणुकीच्या घडामोडी मोठ्या संख्येने घडल्या. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील निवडणुकीची रणनीती आखाती नगर मध्ये तळ ठोकून होते.
बुधवार पर्यंत तीस उमेदवारांनी अर्ज मागे घेतले होते. राहाता सोसायटी मतदारसंघातून माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, शेवगावमधून आजी आमदार चंद्रशेखर घुले यांची नामांकन पत्र दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यांनगर उमेदवारी मागे घेतल्याने पाथर्डीतून आ. मोनिकाताई, कोपरगाव मधून विवेक कोल्हे यांची बिनविरोध निवड झाली. तर जामखेड मधून राळेभात पितापुत्रांपैकी एकाची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. बुधवार पर्यंत २१ जागांपैकी पाच जागा बिन विरोध झाल्या होत्या.
गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात नेते, कार्यकर्ते यांची मोठी गर्दी झाली होती. मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे एकाच दिवसात आणखी तब्बल १२ जागा बिनविरोध निवडल्याचे स्पष्ट झाले.
यात आठ जागा सेवा सोसायटी मतदार संघातील आहेत. दरम्यान जामखेड सेवा सोसायटी मतदार संघातून जेष्ठ नेते व विद्यमान संचालक जगन्नाथ राळेभात यांनी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे या मतदार संघातून त्यांचे पुत्र अमोल राळेभात जिल्हा बँकेवर बिनविरोध निवडले आहेत.