ताज्या बातम्या

मंत्र्याच्या मित्राच्या घरी सापडले २.८२ कोटींचे घबाड आणि 133 सोन्याची बिस्किटे

दिल्ली : आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party) नेते आणि मंत्री सत्येंद्र जैन (Minister Satyendra Jain) यांच्या जवळच्या मित्राच्या घरावर ईडीने (ED) छापा टाकला आहे. छाप्यात २.८२ कोटींची रोकड आणि अनेक सोन्याची नाणी सापडली आहेत. सत्येंद्र जैन सध्या ईडीच्या कोठडीत आहेत.

एक दिवसापूर्वी ईडीने सत्येंद्र जैन यांच्या दिल्ली (Delhi) गुरुग्राममधील (Gurugram) 7 ठिकाणांवर छापे टाकले होते. छाप्यात 133 सोन्याची बिस्किटे सापडल्याची माहिती आहे. यासोबतच मोठ्या प्रमाणात रोकडही सापडली आहे.

यापूर्वी एप्रिलमध्ये, ईडीने चौकशीचा (Inquiry) भाग म्हणून सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाची 4.81 कोटी रुपयांची मालमत्ता आणि त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित कंपन्या जप्त केल्या होत्या.

ईडीने सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली आहे. दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी (ED cell) सुनावली आहे. ईडीने कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली होती.

जैन कुटुंबातील इतर दोन सदस्यांसह सत्येंद्र जैन यांनाही ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या कटाचा भाग असल्याच्या चौकशीत ठेवले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts