2022 Maruti Swift CNG : मारुती स्विफ्ट सीएनजी (2022 Maruti Swift CNG) लवकरच लॉन्च होऊ शकते. यासोबतच कंपनी नवीन जनरेशन स्विफ्ट (new generation Swift) लाँच करण्याचा विचार करत आहे.
जागतिक बाजारपेठेत त्याची टेस्टिंग सुरू झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) महागाईमुळे देशात सीएनजी कारची (CNG cars) मागणी झपाट्याने वाढली आहे. सीएनजी स्वस्त तर आहेच पण मायलेजही जास्त देतो.
हे लक्षात घेऊन मारुती सुझुकीने आपल्या बहुतांश कारचे CNG प्रकार सादर केले आहेत. रिपोर्ट्सनुसार, मारुती सुझुकी आपली लोकप्रिय कार स्विफ्ट देखील फॅक्टरी फिट सीएनजी-किटसह लॉन्च करेल. तथापि, मारुती स्विफ्ट सीएनजी पर्याय फक्त VXI आणि ZXI प्रकारांसह उपलब्ध असेल.
मारुती स्विफ्ट सीएनजी बुकिंग सुरू
मारुतीच्या काही डीलरशिपवर स्विफ्ट सीएनजीची अनधिकृत बुकिंग सुरू झाली आहे. 11 हजार रुपयांत बुकिंग करता येईल. यावरून कंपनी लवकरच ही कार लाँच करेल असा अंदाज बांधला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे मारुती नवीन Alto K10 लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याचे अधिकृत बुकिंग सुरू झाले आहे.
2022 मारुती स्विफ्ट CNG मायलेज
मारुती स्विफ्ट सीएनजी केवळ 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह ऑफर केली जाईल. सध्या, डिझायर सीएनजी ही देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम सीएनजी सेडान आहे जी 31.12 किमी/किलो मायलेज देते.
स्विफ्ट सीएनजीचे मायलेज आणखी चांगले असेल अशी आशा आहे. सध्या, स्विफ्टला 268 लिटरची बूट स्पेस मिळते. मात्र, सीएनजी किट बसवल्यानंतर त्यात घट होऊ शकते.
2022 मारुती स्विफ्ट CNG किंमत
मारुतीच्या CNG गाड्या त्यांच्या पेट्रोल मॉडेलपेक्षा साधारणतः 80,000 ते 90,000 रुपये जास्त महाग असतात. स्विफ्ट सीएनजी व्हेरियंटच्या किमतीही सारख्या असू शकतात. सध्या, स्विफ्ट VXI 5MT पेट्रोल आणि ZXI 5MT पेट्रोल प्रकारांची किंमत अनुक्रमे 6.82 लाख आणि 7.50 लाख रुपये आहे.
मारुती सुझुकीने आधीच Celerio आणि Dzire चे CNG व्हर्जन लॉन्च केले आहेत. Celerio CNG जानेवारीमध्ये 6.58 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली होती.
डिझायर सीएनजी मार्चमध्ये 8.14 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली होती. याशिवाय मारुती अल्टो, वॅगनआर, एर्टिगा आणि ईको देखील सीएनजी किटसह येतात. यासोबतच कंपनी Brezza CNG आणण्याच्या तयारीत आहे.