5G Service : 1 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते 5G सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र ही सेवा (5G) सर्व शहरात सुरु झाली नसून काही निवडक शहरात सुरु झाली आहे.
5G सेवा सुरु करणारी एअरटेल (Airtel) ही देशातील पहिली कंपनी (Airtel 5G) ठरली आहे. परंतु, यावर्षी BSNL च्या ग्राहकांना 5G सेवेचा (BSNL 5G Service) लाभ घेता येणार नाही.
BSNL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवार यांनी इंडिया मोबाइल काँग्रेस (IMC 2022) मध्ये सांगितले की कंपनी पुढील 18 महिन्यांत सुमारे 1.25 लाख 4G मोबाइल साइट लॉन्च करण्याची योजना आखत आहे.
नोव्हेंबरपर्यंत 4G नेटवर्क सुरू करण्याची योजना आहे. BSNL 4G आणि 5G साठी TCS सारख्या मोठ्या कंपन्यांशी बोलणी करत आहे. IMC मध्ये, BSNL ने त्यांच्या 4G आणि 5G नेटवर्कचा रोडमॅप देखील सादर केला आहे.
BSNL च्या 5G सेवेबाबत, IT आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) यांनी देखील सांगितले आहे की BSNL ची 5G सेवा 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू होईल. ते म्हणाले की, बीएसएनएलच्या 5जी सेवेबाबत सातत्याने काम सुरू असून ही सेवा वेळेवर सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
एअरटेल देशात 5G सेवा सुरू करणारी पहिली कंपनी ठरली आहे. एअरटेलने दिल्ली (Delhi), कोलकाता, मुंबई आणि वाराणसी या आठ शहरांमध्ये आपली 5G सेवा सुरू केली आहे. एअरटेलचे 5G नेटवर्क सिग्नल या शहरांतील वापरकर्त्यांच्या 5G फोनमध्ये मिळू लागले आहेत.