ताज्या बातम्या

आधुनिक कर्ण! उत्तर प्रदेशात उद्योगपतीने दान केली ६०० कोटींची संपत्ती

Uttar Pradesh:उत्तर प्रदेशातील मुरादाबादचे उद्योगपती डॉ. अरविंद कुमार गोयल यांनी आपली संपूर्ण संपत्ती गरिबांसाठी दान केली आहे. त्यांनी दान केलेल्या मालमत्तेची किंमत सुमारे सहाशे कोटी रुपये आहे.

आयुष्यभर कष्ट करून उभे केलेले शेकडो कोटी रुपयांचे साम्राज्य त्यांनी एका क्षणात दान करण्याचा निर्णय घेतला. डॉ. गोयल यांनी आपली कमाई गरीब आणि अनाथ मुलांच्या शिक्षण आणि वैद्यकीय उपचारासाठी राज्य सरकारला देण्याची घोषणा केली आहे.

मुरादाबादच्या सिव्हिल लाईन्समध्ये डॉक्टर अरविंद कुमार गोयल यांचा बंगला आहे. केवळ हा बंगला डॉ. गोयल यांनी त्यांच्याकडे ठेवला आहे. सोमवारी रात्री त्यांनी सर्व काही दान करण्याची घोषणा करताच, संपूर्ण शहरात त्यांच्याच नावाची चर्चा सुरू झाली.

मंगळवारी सकाळपासूनच त्यांच्या बंगल्यावर लोकांची गर्दी होऊ लागली.डॉ. अरविंद कुमार गोयल यांच्या पश्चात त्यांची पत्नी रेणू गोयल याशिवाय त्यांची दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा मधुर गोयल मुंबईत राहतो.

लहान मुलगा शुभम प्रकाश गोयल मुरादाबाद येथे राहतो. डॉ गोयल यांचे वडील प्रमोद कुमार गोयल आणि आई शकुंतला देवी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे मेहुणे मुख्य निवडणूक आयुक्त होते.

डॉ. गोयल यांचे जावई कर्नल आणि सासरे लष्करात न्यायाधीश आहेत.संपत्ती दान करण्याच्या निर्णयाबाबत डॉ. गोयल म्हणाले की, २५ वर्षांपूर्वीच आपण संपत्ती दान करण्याचा निर्णय घेतला होता.

तेव्हा डिसेंबर महिना होता. मी रेल्वेतून प्रवास करीत होतो. माझ्यासमोर एक माणूस थंडीने थरथरत होता. त्याच्या पायात घोंगडी किंवा चप्पल नव्हती. मी त्यांना माझे शूज दिले पण थंडीमुळे माझ्याकडून राहवले गेले नाही.

मला ती थंडी सहन होत नव्हती. त्या रात्री मला वाटले की किती लोक थंडी वाजवत असतील. तेव्हापासून मी गरीब आणि निराधार लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू लागलो. मी खूप प्रगती केली आहे पण जीवनात भरवसा नाही.

त्यामुळे मी जिवंत असताना माझी मालमत्ता योग्य हातात सोपवत आहे. जेणेकरून काही गरजूंना त्याचा उपयोग होईल. माझी मालमत्ता दान करण्यासाठी मी जिल्हा प्रशासनाला पत्र लिहिले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts