7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) महागाई भत्त्याबाबत (DA) अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा (Declaration) झालेली नसली तरी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या परिपत्रकात 1 जुलैपासून महागाई भत्ता दिला जात असल्याचा दावा केला जात आहे.
या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तो 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आला आहे. परंतु, ही अधिसूचना (OM) बनावट आहे.
सरकारी एजन्सी पीआयबीने तथ्य तपासणीमध्ये हे निवेदन खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. व्यय विभागाने असे कोणतेही कार्यालयीन ज्ञापन जारी केलेले नाही. सध्या अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) अशी कोणतीही अधिकृत नोट जारी केलेली नाही.
38% DA चे पैसे कधी येणार?
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचेल. नवीन महागाई भत्ता सप्टेंबर 2022 च्या पगारात दिला जाईल.
यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही येणार आहेत. नवीन महागाई भत्ता 1 जुलै 2022 पासून लागू मानला जाईल. एकंदरीत नवरात्रीच्या वेळी ते सरकार भरणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खिशात मोठा पैसा येणार आहे.
पगारात काय फरक पडणार?
7व्या वेतन आयोगात किमान मूळ वेतन 18,000 रुपये आणि कॅबिनेट सचिव स्तरावर 56900 रुपये आहे. 38 टक्क्यांनुसार 18000 रुपयांच्या मूळ पगारावर वार्षिक डीएमध्ये एकूण 6840 रुपयांची वाढ मिळेल.
एकूण डीए दरमहा 720 रुपयांनी वाढेल. 56,900 रुपयांच्या कमाल मूळ वेतनाच्या ब्रॅकेटमध्ये, वार्षिक महागाई भत्त्यात एकूण वाढ 27,312 रुपये असेल. या वेतन ब्रॅकेटमध्ये असलेल्यांना 34% च्या तुलनेत 2276 रुपये अधिक मिळतील.