ताज्या बातम्या

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी ! DA नंतर हे 3 भत्ते वाढणार, जाणून घ्या सविस्तर

7th Pay Commission : तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी केंद्र सरकारच्या (Central Goverment) कोणत्याही विभागात नोकरी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. गेल्या दिवशी केंद्र सरकारने महागाई भत्ता (DA) ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के केला होता.

यानंतर अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) जानेवारी महिन्यापासून वाढीव भत्त्याची थकबाकी (Arrears) देण्याची घोषणा केली. मात्र, कर्मचाऱ्यांना १८ महिन्यांची थकबाकी अपेक्षित होती.

कर्मचाऱ्यांच्या पगारात होईल आणखी वाढ

याच क्रमाने आता कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कर्मचाऱ्यांचे आणखी तीन भत्ते वाढविण्याचा सरकार विचार करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यावर निर्णय झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात आणखी वाढ होणार आहे.

HRA वाढ शक्य

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर घरभाडे भत्त्यात (HRA) वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने एचआरए वाढवण्याचा निर्णय घेतल्यास ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.

शहर भत्ता आणि टीएही वाढणार!

सरकारने महागाई भत्त्यासह एचआरए वाढवल्यास शहर भत्ता आणि प्रवास भत्ता यावरही परिणाम होईल. वास्तविक, डीए वाढल्याने या दोन्ही भत्त्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा वाढली आहे.

TA आणि CA मध्ये वाढ

महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांच्या प्रवास भत्त्यात (TA) आणि शहर भत्त्यात (CA) वाढ होणार आहे. प्रत्यक्षात डीए वाढल्यानंतर टीए आणि सीए वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Renuka Pawar

Recent Posts