7th Pay Commission : तुम्हीही केंद्रीय कर्मचारी (Central Staff) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण सरकार (Govt) तुम्हाला एक आनंदाची बातमी देणार आहे.
ज्यामधे तुम्ही महागाई भत्ता (DA) वाढण्याची वाट पाहत असाल तर पुढच्या महिन्यापासून तुमचा पगार (salary) 15000 रुपयांनी वाढू शकतो.
केंद्र सरकारने (Central Govt) यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे.
डीए थकबाकीचे पैसेही खात्यात ट्रान्सफर केले जातील
ही घोषणा (Declaration) लवकरच म्हणजेच सप्टेंबर महिन्यात केली जाऊ शकते. एआयसीपीआय इंडेक्सनुसार, डीए वाढवल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसोबतच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात थकबाकीच्या स्वरूपात हस्तांतरित केले जातील.
पुढील महिन्यापासून 38% महागाई भत्ता मिळणार आहे
सातव्या वेतन आयोगाच्या सध्याच्या स्केलनुसार कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना 34 टक्के दराने महागाई भत्ता आणि डीआर दिला जात आहे, मात्र पुढील महिन्यात औपचारिक घोषणा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढणार आहे. यामधून तुम्हाला 38 टक्के दराने महागाई भत्ता मिळेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 38 टक्के असेल
7 व्या वेतन आयोगामध्ये, सध्याच्या रचनेत, सर्व केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने DA आणि DR दिला जात आहे. परंतु, सप्टेंबरनंतर, पेमेंट 38% दराने केले जाईल.
सप्टेंबर महिन्याच्या पगारासह तीन महिन्यांचा महागाई भत्ता दिला जाईल. ते जुलै आणि ऑगस्टसाठी डीए थकबाकीसह देखील येईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतन आणि श्रेणीनुसार पगारवाढीची कल्पना येऊ शकते.
मूळ वेतन 31550 रुपये असल्यास पगार किती वाढेल?
7 व्या वेतन आयोगानुसार, जर तुमचा मूळ पगार 31550 रुपये असेल आणि DA मध्ये 38 टक्के वाढ झाली असेल, तर तुमचा पगार किती वाढणार आहे ते येथे जाणून घ्या.
तुमचा पगार किती वाढेल या गणनेतून समजून घेऊया (DA Calculation)-
मूळ वेतन – 31550 रुपये
महागाई भत्ता 38 टक्के – 11989 रु
विद्यमान डीए – 34% – रु 10727
DA किती वाढेल – 4 टक्के
मासिक पगार वाढ – रु. 1262
वार्षिक पगारात वाढ – रु. 15144