7th pay commission : मोदी सरकार (Modi Govt) केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (central employees) आनंदाची बातमी (Good news) देण्याच्या विचारत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या (Central Govt) कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.
तुम्हीही वाढीव डीएची वाट पाहत असाल तर तुमची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. नवरात्रीमध्ये कर्मचाऱ्यांना वाढीव डीएची (DA) भेट मिळू शकते, असे मानले जात आहे.
28 सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे
महागाई भत्त्याची औपचारिक घोषणा 28 सप्टेंबरला म्हणजेच तिसऱ्या नवरात्रीला केली जाऊ शकते. त्याचबरोबर 1 ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांचा डीए 38 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. यासोबतच ऑक्टोबर महिन्यात त्यांना मागील दोन महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही मिळणार आहेत.
38% DA मिळेल
यावेळी सरकार डीएमध्ये 4 टक्के वाढ जाहीर करणार आहे, त्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरून 38 टक्के होईल. कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या पगारात वाढलेल्या महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. 1 जुलैपासून वाढीव डीए लागू झाल्यास कर्मचाऱ्यांना 2 महिन्यांची थकबाकी म्हणून पैसे मिळतील.
मूळ वेतन 31550 रुपये असल्यास पगार किती वाढेल?
7 व्या वेतन आयोगानुसार, जर तुमचा मूळ पगार 31550 रुपये असेल आणि DA मध्ये 38 टक्के वाढ झाली असेल, तर तुमचा पगार (salary) किती वाढणार आहे ते येथे जाणून घ्या.
तुमचा पगार किती वाढेल या गणनेतून समजून घेऊया (DA Calculation)-
मूळ वेतन – 31550 रुपये
महागाई भत्ता 38 टक्के – 11989 रु
विद्यमान डीए – 34% – रु 10727
DA किती वाढेल – 4 टक्के
मासिक पगार वाढ – रु. 1262
वार्षिक पगारात वाढ – रु. 15144
मूळ पगार 18000 आहे, तर किती फायदा होणार?
या व्यतिरिक्त, जर तुमचा मूळ पगार 18000 रुपये असेल, तर तुमच्या DA मध्ये एकूण 6840 रुपयांची वाढ होईल, म्हणजेच तुम्ही मासिक DA बद्दल बोलल्यास, तुमचा पगार 720 रुपयांनी वाढेल.