ताज्या बातम्या

7th Pay commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! सरकार महागाई भत्त्यात करणार एवढी वाढ; पहा संपूर्ण आकडेवारी

7th Pay commission : जर तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल, तर नवीन वर्ष तुमच्यासाठी खूप आनंददायी जाणार आहे. कारण नवनर्षात कामगार मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीच्या आधारे जानेवारीत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

AICPI निर्देशांकात 1.2 अंकांची वाढ

सप्टेंबर 2022 च्या तुलनेत, ऑक्टोबरसाठी AICPI निर्देशांकात 1.2 अंकांची वाढ झाली आहे. तो ऑक्टोबरमध्ये 132.5 च्या पातळीवर गेला आहे, तर सप्टेंबरमध्ये तो 131.3 टक्के होता.

यापूर्वी ऑगस्टमध्ये हा आकडा 130.2 अंक होता. जुलै महिन्यापासून यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सततच्या वाढीमुळे, नवीन वर्षाच्या जानेवारीत होणार्‍या 65 लाख कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ होण्याचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे.

DA किती वाढणार?

जुलैचा महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. आता त्यात पुन्हा 4 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर 42 टक्के होईल. या वाढीनंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात लक्षणीय वाढ होणार आहे.

सातव्या वेतन आयोगाअंतर्गत (सातव्या वेतन आयोग) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए (डीए वाढ) वर्षातून दोनदा वाढवला जातो. जानेवारी 2022 आणि जुलै 2022 चा DA जाहीर झाला आहे. आता जानेवारी 2023 चा डीए जाहीर केला जाईल.

डेटा कोण जारी करतो?

AICPI निर्देशांकाच्या आधारे महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे ठरविले जाते? दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी, अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) ची आकडेवारी कामगार मंत्रालयाद्वारे जारी केली जाते. हा निर्देशांक 88 केंद्रांसाठी आणि संपूर्ण देशासाठी तयार करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts