8th Pay Commission Update : केंद्रीय कर्मचारी (Central Staff) सध्या 8 व्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. परंतु, सरकारच्या हालचालीवरून आणखी कोणताही आयोग (8th Pay Commission) स्थापन होणार नसल्याचे दिसत आहे.
अशातच सरकारने दुसरा वेतन आयोग स्थापन करण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले आहे. परंतु, आयक्रोयड फॉर्म्युलावर (Aykroyd formula) आधारित सर्व भत्ते आणि पगारांचे पुनरावलोकन केले जाण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी लोकसभेत यांनी याबाबत माहिती दिली. “केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा केंद्रीय वेतन आयोग स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव अद्याप सरकारकडे विचाराधीन नाही”.
1 जानेवारी 2026 पासून त्याची अंमलबजावणी करता येईल का? असा प्रश्न त्यांना विचारला होता. परंतु त्यांनी आठवा केंद्रीय वेतन आयोग स्थापन होणार नसल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
महागाई लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) दिला जातो. दरम्यान केंद्रीय कर्मचारीही डीएची वाट पाहत आहेत, याबाबत सरकार लवकरच निर्णय घेऊ शकते.
पुढे चौधरी म्हणाले की, सरकार (Govt) अशा प्रणालीवर काम करत आहे, जुंमुळे कर्मचार्यांचे वेतन त्यांच्या कामगिरीच्या आधारे वाढेल. त्याचबरोबर आयक्रोयड फॉर्म्युलाच्या आधारे सर्व भत्ते आणि पगारांचे पुनरावलोकन केले जाऊ शकते. याच फॉर्म्युलाच्या आधारावर कर्मचाऱ्यांची बढती होईल.