अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :-स्टेट बँकेतून पाच लाख रुपयांची रक्कम काढून घरगुती का़मासाठी घेऊन जात असताना ती चाेरट्यांनी लुटली. ही घटना प्रेमदान चौकातील दत्त मंदिरा समोर दुपारच्या सुमारास घडली.
मोटार सायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी बँग हिसकावून पोबारा केला. भर दिवसा आणि वर्दळीच्या रस्त्यावर हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी किशोर अमृतलाल पोखरणा यांच्या फियादीवरून तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला अाहे. तोफखाना हद्दीत रविवारी रात्रीच एक पतसंस्था, बेकरी शॉप आणि दोन राहत्या घरावर चोरट्यांनी चोरीचा प्रकार घडला.
मोठा ऐवज चोरला आहे. तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी,चाेऱ्या लू़ट, चैनस्नेकिंग सारख्या प्रकारात वाढ होत आहे. मुळे सामान्य नागरिक, महिला, व्यापारी वर्गात घबराट निर्माण झालेली आहे.