अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- टांग्याला घोडा जुपुन शर्यत काढणार्या तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.
त्यानुसार बंडू दंगु बडे, रावसाहेब दंगु बडे (दोघे रा. मेहकरी ता. नगर) व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदरी ता. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्याकडून 60 हजार रूपये किंमतीचे तीन टांगे पोलिसांनी जप्त केली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, आज सकाळच्या सुमारास कल्याण रोडवरील हिंगणगाव फाट्यावर पोलिसांनी ही कारवाई केली.
आरोपी यांनी सकाळी टांग्याला घोडा जुपुन त्यांना चाबुकाने क्रुरपणे मारहाण करून शर्यत काढली. या प्रकरणाची माहिती एमआयडीसीचे सहाय्यक निरीक्षक युवराज आठरे
यांना मिळताच त्यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन आरोपींकडील टांगे जप्त केले. तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार लाळगे करीत आहे.