मनपा सभापती निवडीच्या एक दिवस आधीच शिवसेनेत फाटाफूट

अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- स्थायी समिती सभापतीची उद्या (गुरुवारी) 3 वाजता होणार्‍या विशेष सभेत निवड होणार आहे. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी अर्ज दाखल केला असून महापौर वाकळे यांच्या हजेरीमुळे राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे.

तर शिवसेनेकडून विजय पठारे यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र या निवडीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेत फाटाफूट झाल्याचे समोर आले. दरम्यान, विजय पठारे यांनी शिवसेनेकडून सभापतिपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

पाच सदस्य असलेल्या सेनेतील तिघे पठारेंच्या अर्ज भरतेवेळी गायब होते. आज शिवसेनेकडून उमेदवार पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी केवळ रिता भाकरे या एकमेव सदस्या त्यांच्यासोबत होत्या.

अप्पा नळकांडे, सचिन शिंदे आणि प्रशांत गायकवाड हे तिघं सदस्य गायब झाल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली. दरम्यान स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक उद्या गुरूवारी होत असून आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती.

राष्ट्रवादीला भाजप, काँग्रेस, बसपाने साथ दिल्याने शिवसेना एकाकी पडली आहे. मुंबईतून आदेश येईपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांनी घेतला.

सचिन शिंदे आणि विजय पठारे यांच्यापैंकी एकाचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार होता, मात्र शिंदे गायब असल्याने विजय पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून सचिन शिंदे यांचे नाव असल्याचे समजते.

पठारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी या तिघांच्या शोधासाठी बाहेर पडले. काही पदाधिकारी थेट शिंदे यांच्या घरी पोहचल्याचे समजते.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास पदाधिकारी व शिंदे यांची भेट झाली. मात्र हे तिघे गायब का होते? याची विविधांगाने चर्चा सुरू आहे.

स्थायी समितीचे 16 सदस्य असून सभापतीची खुर्ची मिळविण्यासाठी 9 मतांची गरज आहे. दरम्यान स्थायी साठी कोणाकडे किती संख्याबळ आहे जाऊन घेऊयात एक आकडेवारी

राष्ट्रवादी (5) – अविनाश घुले, समद खान, प्रकाश भागानगरे, सागर बोरुडे, परवीन कुरेशी.

शिवसेना (5) – अप्पा नळकांडे, विजय पठारे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, नीता भाकरे

बसपा (एक) – मुदस्सर शेख काँग्रेस (एक) – सुप्रिया जाधव

भाजप (चार) – वंदना ताठे, रविंद्र बारस्कर, सोनाबाई शिंदे, मनोज कोतकर

 

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts