Maharashtra : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर सडकून टीका होत आहे. तसेच आता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. तसेच राज्यपालांना हटविण्याची मागणी देखील केली आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी मुंबईतील मराठी लोकांचा ‘अपमान’ केला होता, त्यांनी आधी सावित्रीबाई फुलेंवर टीका केली. मुंबई आणि ठाणेकरांवर टीका केली.
आता त्यांनी आमचे दैवत शिवाजी महाराजांवर टीका केली आहे. बाप हा बाप असतो. तो जुना असतो का? त्यामुळे बेताल विधानं करणाऱ्या राज्यपालांना हटवले पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
ठाकरे म्हणाले की, राज्यपाल महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळत आहेत. काल मंत्रिमंडळ बैठक न झाल्याबद्दल ठाकरे म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थित राहणे हा अपवाद आहे.
सरकारमधील बहुतांश लोक सध्या गुजरातमध्ये असल्याने मंत्रिमंडळाची बैठक रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना नेते म्हणाले की, महाराष्ट्रात जेव्हापासून सरकार बदलले तेव्हापासून राज्याचा अपमान होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे संकेतही दिले आहे. दोन चार दिवसात हे पार्सल राज्यातून नाही गेलं तर आम्ही महाराष्ट्र बंद करू किंवा विराट मोर्चा काढू असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.