मुंबई : ५ राज्यांच्या निवडणुकांचा निकाल (Election Result) काल जाहीर झाला आहे. यामध्ये पंजाब (Punjab) वगळता बाकी सर्व राज्यात भाजपने (BJP ) विजयाचा डंका रोवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) भाजप नेत्यांना महाविकास आघाडीतील नेत्यांना डिवचायला सोन्याहून पिवळे झाले आहे.
महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कालपासूनच शिवसेना (Shiv sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) डिवचायला सुरुवात केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याची संधी सोडली नाही.
भाजपच्या विजयाचा जल्लोष महाराष्ट्रातही तेव्हडाच दिसत आहे जितका निवडून आलेल्या राज्यात दिसत आहे. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी शिवसेनेला टोला लगावत जोरदार चिमटा काढला आहे.
काही लोक गोरखपूरमध्ये (Gorakhpur) सभा घेऊन गोरखपूर बदलायला गेले होते. जे मुंबईचे गोरेगाव बदलू शकले नाहीत ते गोरखपूर काय बदलणार? मोदी है तो मुमकीन है असे म्हणत आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
2024 साली दिल्लीच्या खुर्चीत आम्ही पुन्हा बसणार. उत्तर प्रदेश, गोव्यात बघा आम्ही करुन दाखवतो. उत्तर प्रदेशात युवराजांची अती विराट सभा…झंझावाती दौरा.
अशांसह बोरु बहाद्दर मोठ्या वल्गना करीत होते. पण सगळ्या बुडबुड्यांचे निकाल लागले. अती प्रचंड मतांनी झंझावाती डिपॉझिट गुल होऊन शिवसेना हारली असा चिमटा शेलारांनी शिवसेनेला काढला आहे.
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, शिवसेनेची अवस्था “एक मासो आणि खंडी भर रस्सो!” अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे, असा मालवणी भाषेतून त्यांनी टोलाही लगावला.
तर नोटा पेक्षा कमी मते घेऊन शिवसेना पराभव झाला हेही त्यांनी अधोरेखित केले. गोरखपूरमध्ये सभा घेऊन गोरखपूर बदलायला गेले होते. जे मुंबईचे गोरेगाव बदलू शकले नाहीत ते गोरखपूर काय बदलणार? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.