China : भारतासह जगभरात कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना चीनमधून पुन्हा चिंताजनक बातमी आली आहे.
तेथे ओमायक्रॉनच्या बीए ४ प्रकारच्या विषाणूची लागण झालेला पहिला रुग्ण आढळून आला आहे, चीन सरकारनेच ही माहिती जाहीर केली आहे.
चीनमध्ये नेदरलँडमधून आलेल्या तरुणाला या प्रकाराची लागण झाली होती. त्याने लशीच्या दोन्ही मात्राही घेतलेल्या होत्या, तरीही त्याला लागण झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. बीजिंगसह अनेक भागात चीनने लादलेले निर्बंध कायम करण्यात आले आहेत.
तेथील मॉल, रेस्टॉरंट, बंदिस्त ठिकाणी होणारे कार्यक्रम आणि पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. नागरिकांना घरूनच काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.