पृथ्वीभोवती फिरतोय चंद्राचा तुकडा ? खगोलशास्त्रज्ञांना मिळाला पुरावा

Marathi News : पृथ्वीजवळील लघुग्रह हा चंद्राचा तुटलेला तुकडा असल्याचा पुरावा खगोलशास्त्रज्ञांना मिळाला आहे. या लघुग्रहाचे नाव ‘कामोओलेवा’ आहे, ज्याचा अर्थ फिरणारा तुकडा आहे.

हा एक चाकाच्या आकाराचा खडक असून एप्रिल २०१६ मध्ये पृथ्वीच्या ९ दशलक्ष मैल ( १४.४ दशलक्ष किलोमीटर) अंतरावर परिभ्रमण करताना तो अंतराळ संशोधकांना आढळून आला.

कामोओलेवाची रचना चंद्रासारखीच असल्याची माहिती २०२१ मध्ये समोर आल्यानंतर शास्त्रज्ञांना हा विचित्र खडक पाहून आश्चर्य वाटल्याने त्याला चंद्राचा तुकडा असेच म्हटले गेले आहे.

अॅरिझोना विद्यापीठातील ग्रहशास्त्रज्ञ रेणू मल्होत्रा यांचा नवीन अभ्यास एका जर्नलमध्ये २३ ऑक्टोबर रोजी प्रकाशित झाला आहे. या अभ्यासानुसार, कामोओलेवाचा चंद्र हा स्रोत असल्याचा दावा केला आहे.

मल्होत्रा यांच्या अभ्यासात दोन असामान्य गोष्टी आढळून आल्या असून परिभ्रमण गुणधर्मांनी खगोलशास्त्रज्ञांना कामोओलेवाचे परीक्षण करण्यासाठी आकर्षित केले आहे. यातील पहिला गुणधर्म म्हणजे त्याचा खरा परिभ्रमण भागीदार सूर्य असला तरी तो अर्ध-उपग्रहासारखा पृथ्वीच्या इतका जवळ आहे की,

तो पृथ्वीभोवती फिरताना दिसतो. तर दुसरे म्हणजे, हा लघुग्रह लाखो वर्षे पृथ्वीच्या जवळ राहण्याचा अंदाज आहे. अशाप्रकारे पृथ्वीजवळील अनेक लघुग्रह केवळ काही दशकेच पृथ्वीजवळ राहतात. कामोओलेवाचे हे वेगळेपण खगोलशास्त्रज्ञांना त्याच्या अभ्यासासाठी प्रवृत्त करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Marathi News

Recent Posts