आदिवासी विद्यार्थ्यांसाठी विखे ‘या’ ठिकाणी स्वतंत्र वसतिगृह उभारणार

अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :-  भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी लोणी येथे १० लाख रुपये खर्च करून स्वतंत्र आदिवासी वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी देण्यासाठी 8 कोटी. या वसतिगृहामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान आदिवासी विकास प्रकल्‍पाअंतर्गत देण्‍यात येणाऱ्या खावटी कर्ज योजनेतून मंजूर झालेल्‍या धान्‍य किटचे वितरणप्रसंगी विखे बोलत होते. यावेळी बोलताना विखे म्हणाले, राहाता तालुक्‍यात २ हजार ५८ आदिवासी कुटुंबीयांना खावटी कर्ज योजनेचा लाभ मिळाला आहे.

तालुक्‍यात शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होत आहे. आदिवासी समाजासाठी घरकुलांची निर्मिती हा आपला प्राधान्‍यक्रम असणार आहे. या समाजातील विद्यार्थी आता शिक्षणाच्‍या मुख्‍य प्रवाहात आणावे लागतील. केंद्र सरकारने लागू केलेल्‍या या योजनांचा लाभ यासाठी मिळवून द्यावा लागेल.

लोणी येथे आदिवासी समाजातील विद्यार्थ्‍यांकरिता आठ कोटी रुपयांच्‍या निधीतून वसतिगृह मंजूर झाले असून, लवकरच त्‍याची उभारणी पूर्ण होईल. याप्रसंगी प्रकल्‍प आधिकारी संतोष ठुबे, रेवन्नाथ जाधव, काळू रजपूत, माजीमंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, सभापती नंदाताई तांबे,

ट्रक्‍स सोसायटीचे चेअरमन नंदू राठी, जिल्‍हा परिषद सदस्‍य दिनेश बर्डे, प्रकल्‍प आधिकारी संतोष ठुबे, पंचायत समिती सदस्‍य संतोष ब्राह्मणे, काळू रजपूत, संचालक संजय आहेर, रेवन्‍नाथ जाधव, उपसरपंच गणेश विखे, अनिल विखे, प्रकल्‍प समन्‍वयक आंबादास बागुल, सहायक योगेश चोथवे उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts