Infinix smartphone : जर तुम्ही 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता Infinix Hot 20 Play हा स्मार्टफोन 8,999 रुपयांना खरेदी करू शकता.
या फोनची मूळ किंमत 11,999 रुपये इतकी आहे. ग्राहकांना आता या स्मार्टफोनवर 25% डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा स्मार्टफोन खरेदी करा.
अनेक स्मार्टफोन कंपन्या किंमत कमी ठेवण्यासाठी अनेकदा रॅम कमी ठेवतात किंवा बॅटरी व्यवस्थित देत नाहीत. तुमच्याकडे आता स्वस्त Infinix स्मार्टफोन खरेदी करण्याचा पर्याय आहे.
स्वस्तात खरेदी करता येणार Infinix Hot 20 Play
कंपनीचा Infinix Hot 20 Play चा बेस व्हेरिएंट 4GB रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह येतो. भारतात या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये इतकी आहे यावर आता 25% डिस्काउंट मिळत आहे.
त्यामुळे तुम्हाला तो 8,999 रुपयांना खरेदी करता येईल. ग्राहकांना डिव्हाइसवर बँक आणि एक्सचेंज डिस्काउंटचाही लाभ मिळत आहे, ज्यामुळे किंमत आणखी कमी होत आहे.
फेडरल बँकेच्या डेबिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला या स्मार्टफोनवर 10 टक्के म्हणजेच 1,500 पर्यंत सवलत मिळत आहे. त्याचप्रमाणे Flipkart Axis Bank कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 5% कॅशबॅक मिळेल. UPI व्यवहारांवर 300 रुपये सूट व्यतिरिक्त, एक्सचेंज डिस्काउंटसह 8,400 रुपये सूट मिळण्याची शक्यता आहे.
स्पेसिफिकेशन
स्पेसिफिकेशन बाबत सांगायचे झाले तर स्मार्टफोनमध्ये 6.82-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. तर MediaTek Helio G37 प्रोसेसर उपलब्ध आहे त्याशिवाय या स्मार्टफोनचे स्टोरेज 3GB RAM इतके आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने हे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. Android 12 वर आधारित XOS 10.6 फोनमध्ये उपलब्ध आहे.
त्याशिवाय कॅमेराबद्दल बोलायचे झाले तर, मागील पॅनेलमध्ये क्वाड-एलईडी फ्लॅशसह 13MP ड्युअल एआय कॅमेरा आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 8MP फ्रंट कॅमेरा आहे. 6000mAh बॅटरी 18W चार्जिंगसह समर्थित आहे.