ताज्या बातम्या

Aadhaar card : आधार कार्डवरील जन्मतारीख चुकली आहे? तर अशा सोप्प्या मार्गाने करा दुरुस्त

Aadhaar card : आधार कार्ड ची गरज आता सर्वत्र झाली आहे. जेव्हा आपण आधार कार्ड (Aadhaar card) बनवून घेत असताना अनेकदा त्यावरील जन्मतारीख (Birthdate) किंवा इतर काहीही चुकीचे असते.

त्यामुळे अनेक वेळा आपल्याला सरकारी कामात किंवा इतर ठिकाणी त्रास होत असतो. आधार कार्ड मध्ये चूक (Error Aadhar card) असेल तर आपल्याला कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे आधारकार्ड मध्ये काही चूक असेल तर लगेचच दुरुस्त करून घ्या.

त्यामुळे तुमच्या आधार कार्डमध्ये जन्मतारखेत काही चूक असल्यास ती ताबडतोब दुरुस्त करून घ्या, जेणेकरून पुढे कोणतीही अडचण येणार नाही.

UIDAI नुसार, केवळ घोषित किंवा असत्यापित जन्मतारीख ऑनलाइन अपडेट (Date of birth online update) केली जाऊ शकते.

जन्मतारीख अपडेट करण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्राची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. याबाबत UIDAI ने ट्विटमध्ये म्हटले आहे की, #AadhaarOnlineServices तुम्ही खाली दिलेल्या लिंकद्वारे तुमच्या आधारमध्ये जन्मतारीख ऑनलाइन अपडेट करू शकता.

https://ssup.uidai.gov.in/ssup/ तुम्हाला सहाय्यक कागदपत्रांची यादी पहायची असल्यास या लिंकवर क्लिक करा. https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf. ..#UpdateDoBOnline

– किती खर्च येईल ते जाणून घ्या

त्याचवेळी, या ट्विट केलेल्या फोटोमध्ये असे म्हटले आहे की, ऑनलाइन पोर्टलवर कोणत्याही प्रकारच्या अपडेटसाठी प्रति अपडेट 50 रुपये मोजावे लागतील.

त्याचवेळी, आधारशी लिंक केलेल्या या सेवांचा लाभ घेण्यासाठी तुमचा सध्याचा मोबाइल क्रमांक आधारमध्ये अपडेट करावा, असे UIDAI ने म्हटले आहे.

तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास तुम्ही 1947 वर कॉल करू शकता किंवा help@uidai.gov.in वर ईमेल पाठवू शकता, असेही सांगण्यात आले आहे.

त्याच वेळी, आधार कार्डमध्ये जन्मतारीख अपडेट करण्यासाठी, सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये https://ssup.uidai.gov.in/ssup/ उघडा. आता तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका. त्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि पाठवा OTP वर क्लिक करा.

Renuka Pawar

Recent Posts