Aadhaar Card : सध्या देशातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आधार कार्ड होय. आज देशातील करोडो नागरिकांकडे आधार कार्ड आहे मात्र यापैकी अनेक लोक आहे जे आपला पत्ता काही काही दिवसांनी बदलत असतात यामुळे त्यांना आपल्या आधार कार्डचा देखील पत्ता अपडेट करावा लागतो.
या प्रक्रियेत जास्त वेळ खर्च होतो. मात्र आता हा त्रास मिटणार आहे असून आता तुमचा आधार कार्ड पत्ता लवकरच अपडेट होणार आहे. तसेच, नवीन पत्त्याचा तपशील द्यावा लागणार नाही. तथापि, यासाठी तुम्हाला आधार कार्डसोबत कुटुंब प्रमुख (HoF) यांचा तपशील प्रविष्ट करावा लागेल. त्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेऊया.
HoF म्हणजे काय
नावाप्रमाणेच, हे 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या कुटुंबातील सदस्य आहे. नवीन नियमानुसार, आधार कार्डमधील HoF अपडेट केल्यानंतर, वापरकर्ते सध्याचा पत्ता न देता आधार कार्डमधील पत्ता अपडेट करू शकतील.
आधारशी HoF जोडण्यासाठी काय करावे लागेल?
आधार कार्डमध्ये HoF चे नाव जोडण्यासाठी अर्जदाराचे नाव, HoF चे नाव आणि दोघांमधील नातेसंबंधाचा पुरावा, रेशनकार्ड, मार्कशीट, विवाह प्रमाणपत्र, पासपोर्ट इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतात. त्यानंतर HoF नोंदणीकृत फोन नंबरवर OTP द्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल.
HoF कसे अपडेट करावे
सर्व प्रथम आधार पोर्टलवर जा.
त्यानंतर अपडेट आधार टॅबवर क्लिक करा.
यानंतर HoF आधार क्रमांक टाका.
यानंतर, तुमचा आणि HoF यांच्यातील संबंध सिद्ध करण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे द्यावी लागतील.
यानंतर तुम्हाला रुपये शुल्क भरावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस रिक्वेस्ट नंबर (SRN) मिळेल.
यानंतर HoF ला OTP व्हेरिफिकेशन करावे लागेल.
पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पत्ता बदलला जाईल.
टीप – तुमच्या आणि HoF यांच्यातील संबंधाचा कोणताही पुरावा नसल्यास, UIDAI स्वयं-घोषणास परवानगी देते.
हे पण वाचा :- Amazon Offers : 6,000 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करा ‘हा’ दमदार स्मार्टफोन ; ऑफर पाहून बसेल तुम्हालाही धक्का