Aadhaar Pan Link: प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) अलीकडेच आधार कार्ड (Aadhaar card) पॅनशी (Pan Card) लिंक करणे अनिवार्य केले आहे. जर तुम्ही तुमचा आधार PAN शी लिंक न केल्यास तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल.
आतापर्यंत हा दंड 500 रुपये होता, परंतु जर तुम्ही हे काम निर्धारित मुदतीपूर्वी म्हणजेच 1 जुलैपूर्वी केले नाही तर तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागेल. म्हणजेच आता आधार कार्ड पॅनशी लिंक न केल्यास तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
पॅन आधारशी लिंक न केल्यास हे नुकसान होईल
आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे आज कोणत्याही भारतीय नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. त्यांची अनेक ठिकाणी गरज आहे. सरकारने पॅनशी आधार लिंक करण्यासाठी 1 जुलै 2022 ही अंतिम तारीख निश्चित केली आहे.
जर तुम्ही विहित मुदतीत आधार कार्ड पॅनशी लिंक केले नाही तर तुम्हाला दंड तसेच इतर अनेक नुकसानास सामोरे जावे लागू शकते. तुमचे पॅन कार्ड बंद होऊ शकते. यामुळे तुम्ही आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. पॅन कार्ड अवैध झाल्यानंतर, तुम्हाला ऑनलाइन आयटीआर भरण्यात अडचण येईल. तुमचा कर परतावा अडकू शकतो. एवढेच नाही तर आर्थिक व्यवहारात तुमचा पॅन वापरता येणार नाही. याशिवाय, नवीन बँक खाते उघडतानाही तुम्ही तुमचे पॅन कार्ड वापरू शकणार नाही.
तुमचा पॅन आधारशी कसा लिंक करायचा
एसएमएस द्वारे आधार लिंक करता येईल
एसएमएस पाठवूनही पॅन आणि आधार लिंक केले जाऊ शकतात. यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. एसएमएसचे स्वरूप UIDPAN<space><12 आधार कार्डचे क्रमांक><space><10 अंकी PAN> आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्डमध्ये नाव आणि जन्मतारीख एकच असल्यास ते लिंक केले जाईल.