अबब ! बिबट्या मस्त सरकारी कार्यालयाच्या आवारात फिरतोय

अहमदनगर Live24 टीम, 3 ऑगस्ट 2021 :- दिवसेंदिवस शहरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे या वन्यप्राण्यांचा मूळ अधिवास नष्ट होत आहे. त्यामुळे ते शेतातील दाट पिकांमध्ये वास्तव्य करीत आहेत. अशी शेती मानवी वस्तीलगतही असते.

त्यामुळे बिबटे मानवी वस्तीकडे येत असल्याचे दिसून येते. यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अनेक गावांत, शेतांमध्ये बिबट्या आलेला पाहिला आहे.

आता बिबट्या चक्क अकोले शहरात, तेही पंचायत समितीच्या पोर्चमध्ये वावरताना पाहायला मिळाला. याबाबत अधिक माहिती अशी अकोले शहरातील पोलिस ठाणे व वन विभागाच्या कार्यालयाजवळ असलेल्या पंचायत समितीच्या इमारतीत मांजराची शिकार करण्यासाठी मांजरामागे बिबट्या घुसला.

या वेळी तो पंचायत समिती इमारतीच्या पोर्चमध्ये मुक्तपणे फिरताना त्याचा व्हिडिओ स्थानिक कर्मचाऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये बनवला. या व्हिडिओमध्ये बिबट्या पोर्चमध्ये बिनधास्तपणे संचार करताना दिसत आहे. यावरून बिबट्या आता शेतांसह शहरातही वावरताना दिसत आहे.

त्यामुळे शहरात घबराट निर्माण झाली आहे. नागरिक भयभीत झाले आहेत. जंगले तसेच पाण्यांचे स्त्रोतही कमी होत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येतात.

प्राण्यांना स्वतःवर धोका असल्यास ते हल्ला करतात असे जाणकार सांगतात. एकीकडे हे असले तरी शेवटी प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकांचा बळी गेला आहे हे सत्य देखील आपल्याला नाकारता येणार नाही. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी संबंधित परिसरातील नागरिकांनी वनविभागाकडे केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts