ताज्या बातम्या

ABHA Health Card : मोठी बातमी! केंद्र सरकारने जारी केले डिजिटल हेल्थ कार्ड, जाणून घ्या त्याचे फायदे

ABHA Health Card : आता आधारकार्डप्रमाणे (Aadhar Card) तुमचे डिजिटल हेल्थ कार्ड (Digital Health Card) तयार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आयुष्यमान भारत ‘डिजिटल मिशन’ची सुरुवात केली.

या मिशनअंतर्गत (Digital Mission) आता भारतीय नागरिकांना एक डिजिटल हेल्थ आयडी (Digital Health ID) दिला जाणार आहे. त्यामुळे आता नागरिकांची सर्व वैद्यकीय कागदपत्रे (Medical documents) या कार्डमध्ये जतन केली जाणार आहेत.

जाणून घ्या काय आहे हे डिजिटल हेल्थ कार्ड

डिजिटल हेल्थ कार्ड हे नागरिकांच्या वैद्यकीय इतिहासाची सर्व माहिती ठेवण्याचे डिजिटल माध्यम आहे. त्याला ‘आभा कार्ड’ (ABHA Card) असेही संबोधले जात आहे.

ABHA कार्ड बनवल्यावर तुम्हाला 14 अंकी आयडी क्रमांक मिळेल. यासोबतच तुम्हाला या कार्डमध्ये QR कोड देखील दिला जाईल.

तुमचा सर्व वैद्यकीय इतिहास आणि संबंधित कागदपत्रे या डिजिटल कार्डमध्ये जतन केली जातील. कार्डमध्ये तयार केलेला QR कोड स्कॅन करून डॉक्टर रुग्णाचा सर्व वैद्यकीय इतिहास पाहू शकतात. हे डिजिटल हेल्थ कार्ड सरकारी आणि खाजगी दोन्ही हॉस्पिटलमध्ये वैध असेल.

या कार्डचे काय फायदे आहेत

या कार्डच्या मदतीने तुम्हाला तुमची वैद्यकीय कागदपत्रे सर्वत्र घेऊन जाण्याची गरज भासणार नाही. तुमच्या सर्व लॅब चाचण्या आणि अहवाल या कार्डमध्ये रेकॉर्ड केले जातील.

या कार्डच्या मदतीने तुम्ही कोणत्याही हॉस्पिटल किंवा क्लिनिकमध्ये तुमचा सर्व वैद्यकीय इतिहास शेअर करू शकता. या कार्डच्या मदतीने आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांना जुन्या वैद्यकीय इतिहासासाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

आभा डिजिटल हेल्थ कार्ड कसे मिळवायचे

  • तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच ABHA अॅप डाउनलोड करून बनवलेले तुमचे ABHA डिजिटल हेल्थ कार्ड मिळवू शकता.
  • याशिवाय हेल्थ आयडी पोर्टलवर जाऊन तुम्ही हे कार्ड बनवू शकता.
  • यासाठी सर्वप्रथम हेल्थ आयडी पोर्टलला ( https://healthid.ndhm.gov.in/ ) भेट द्या.
  • यानंतर ‘Create ABHA Number’ या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर एक पर्याय निवडा आणि ‘Next’ वर क्लिक करा.
  • यानंतर, तुम्हाला तुमचा आधार कार्ड क्रमांक किंवा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक येथे टाकावा लागेल.
  • यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • यानंतर तुम्हाला तुमची सर्व माहिती अर्जात भरावी लागेल.
  • यानंतर तुम्हाला ‘माय अकाउंट’ विभागात जाऊन तुमचा फोटो अपलोड करावा लागेल.
  • यानंतर, तुम्ही ‘सबमिट’ या पर्यायावर क्लिक करताच तुमचे ABHA कार्ड तयार होईल.
  • तुम्ही या डिजिटल हेल्थ कार्डची प्रिंटआउट देखील घेऊ शकता.
Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts