AC : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात अनेकजण एसी खरेदी करतात. परंतु, एसी खरेदी करण्यासाठी गेले की त्यांच्या मनात रेटिंगच्या अनुषंगाने अनेक प्रश्न निर्माण होतात. किती स्टार रेटिंग असणारा एसी खरेदी करावा, म्हणजे त्यामुळे घरात थंड वातावरण राहील तसेच वीज बचतही होईल.
तर यासाठी एक फॉर्म्युला असून तो जर तुम्ही जाणून घेतला तर तुम्हाला एसी खरेदी करताना कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहे. जर तुम्ही एसी खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला अडचण येणार नाही.
तुम्हाला हे माहिती असावे की फाइव्ह स्टार एसीमध्ये जास्त कंडेन्सेशन असते, ज्यामुळे तो वापरताना कमी वीज लागते. तर दुसरीकडे, तीन स्टार रेटिंग असलेल्या एसी उपकरणांमध्ये कमी कंडेन्सेशन असते. त्यामुळे त्यांचा वापर केला तर वीज बिल खूप जास्त येते.
जर तुम्ही एक तास तीन स्टार रेटिंग असणारा एसी वापरत असाल तर तो 1.1 युनिट वापरतो. तर दुसरीकडे, 1.5 टन फाइव्ह स्टार एसी एकाच वेळी 0.84 युनिट वापरतो.
ऊर्जा कार्यक्षमतेमुळे, फाइव्ह स्टार एसी हे थ्री स्टार एसीपेक्षा किंचित महाग असतात. तर याशिवाय फाइव्ह स्टार एसीमध्ये अनेक उत्तमोत्तम फीचर्सही उपलब्ध आहेत.
सध्या थ्री स्टार एसी फिल्टरसह येतात, जे हवेतील धूळ आणि प्रदूषण फिल्टर करतात. इतकेच नाही तर या एसी मध्ये तुम्हाला अनेक मोड्स देखील पाहायला मिळतात.