नवी दिल्ली : रशिया आणि यूक्रेन (Russia Ukraine) मध्ये मोठे युद्ध सुरु आहे, मात्र त्याचे पडसात भारतात उमटू लागले आहेत, यावरून आता काँग्रेस (Congress) माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, रशिया म्हणतो, डोन्सात्क, लुहान्स्क हा भाग यूक्रेनचा नाही. त्यामुळे रशियाने यूक्रेनवर हल्ला केला. या हल्ल्याचं टार्गेट नाटो, यूक्रेन आणि अमेरिकेशी (America) भागीदारी तोडण्याचं होते.
तसेच चीनही (Chine) भारतासोबत करू शकते. लडाख आणि अरुणचाल प्रदेश तुमचं नाही, भारताचं सैन्य त्याठिकाणी आहे. सरकारकडे याकडे दुर्लक्ष करत आहे. पण चीनने ते याठिकाणीही लागू करू शकते असे ते म्हणाले आहेत.
त्याचसोबत सरकार सत्य स्वीकारत नाही. जर सत्य स्वीकारलं नाही आणि तयारी केली नाही तर परिस्थिती बिकट होऊ शकते. तेव्हा तुम्ही रिएक्टही होऊ शकणार नाही असे म्हणत राहुल गांधींनी इतर मुद्यावरूनही सरकारला टार्गेट केले.
ते म्हणाले, ज्या देशात शांतता नाही तिथे महागाई वाढत राहणार, द्वेष वाढत जाणार. आर्थिक धोरण चालवू शकत नाही. रोजगारही मिळणार नाही.
जर देशाला मजबूत ठेवायचं असेल तर शांतता हवी. द्वेष पसरवून, लोकांना घाबरवून, मारून देशाची आर्थिक परिस्थिती मजबूत करत येत नाही असे राहुल गांधींनी यावेळी सांगितले आहे.