ताज्या बातम्या

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्यावर कारवाई होणार? घरातून महत्त्वाची कागदपत्रे आयकर विभागाच्या हाती

मुंबई : राज्यात आयकर विभाग (Income Tax) आणि ईडीचे (ED) धाडसत्र सुरु आहे. अनेक मंत्र्यांच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी सुरु आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने काल धाड टाकली आहे.

त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (Shivsena) विरुद्ध भाजप (BJP) असे आरोपसत्र सुरु आहे. या सर्व प्रकरणावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र कधीही दिल्लीसमोर झुकणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान राहुल कनाल यांच्या घरातून आयकर विभागाच्या हाती महत्वाची कागदपत्रे हाती लागली आहेत.

तसेच अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्याही घरी काल आयकर विभागाने छापे घातले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांना टार्गेट केले जात आहे का असा प्रश्न कुठेतरी उपस्थित होत आहे.

राहुल कनाल यांची आयकर विभागाने चौकशी देखील केली असल्याची माहिती मिळत आहे. चौकशी करत असताना घरामध्ये महत्वाची कागदपत्रे सापडली असल्याची माहिती समोर आली आहे.

काल दिवसभर राहुल कनाल यांच्या घराबाहेर केंद्रीय सुरक्षा रक्षकांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राहुल कनाल यांची चौकशी रात्री उशिरापर्यंत चालली होती.

आयकर विभागाने कनाल यांच्या घरातून काही फाईली चौकशीसाठी नेल्या आहेत. चौकशी संपल्यानंतर कनाल यांच्याबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

राहुल कनाल यांनी चौकशी संपल्यानंतर शिवसैनिकांची भेट घेतली. त्यांच्याशी संवाद देखील साधला असल्याची माहिती मिळत आहे.

Renuka Pawar

Published by
Renuka Pawar

Recent Posts